पाचोरा, शहराच्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालुन पोलिस बांधव व नगर पालिकेचे कर्मचारी पुन्हा मैदानात.

0
452

आरोग्य दूत न्यूज,

संपादक, एन एस भुरे (पाचोरा)

पाचोरा, शहराच्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालुन पोलिस बांधव पुन्हा मैदानात.

  • आरोग्य दूत न्यूज,पाचोरा, शहराच्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालुन पोलिस बांधव पुन्हा मैदानात. नागरीकांनी कोरोना संदर्भात सर्व नियम पाळून प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे.
  • कोरोनाचे आजपासून नवे नियम ; जिल्ह्यात आजपासून रात्रीच्या सातच्या आत घरात

जिल्ह्यात कोरोनोचा वाढता संसर्ग पाहता मंगळवार दि. १६  मार्च पासून जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजे दरम्यानच सुरू राहतील. तर हॉटेल परमिट रूम, बार सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सुरू राहतील. असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी दिले आहेत.

२० मार्च पासून विवाह सोहळ्यांना बंदी

पूर्वनियोजित विवाह वा अन्य सोहळ्यांना केवळ २० जणांच्या उपस्थितीसह परवानगी देण्यात आली आहे . मात्र, २० मार्चपासून पुढील आदेश होईपर्यंत सर्वप्रकारचे लग्न वा अन्य सोहळ्यांवर बंदी असेल. संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेऊ लग्न समारंभांना ५० जणांना उपस्थित राहता येणार तर अंत्यविधीत २० जणांच्या उपस्थितीची परवानगी आहे.

हॉटेलसाठी व प्रकारची खाद्य दुकाने, परमिट रूम, बियर बार सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सुरू राहतील . यामध्ये फक्त ५० टक्के उपस्थितीस परवानगी आहे. तसेच रात्री दहा वाजेनंतर होम डिलिव्हरी करता येईल.
सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सर्व व्यक्तींनी चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी सचिव यांच्यावर आहे. बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश नसेल. भाजी बाजार फक्त ५० टक्के सुरू राहील. एका आड एक याप्रमाणे ओटे सुरू राहतील. जिल्हा उपनिबंधकांनी यावर करडी नजर ठेवून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

 जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्या आदेशानुसार आज पाचोरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वतः डी. वाय. एस. पी. भारत काकडे साहेब, पी.आय. नजन पाटील साहेब, पी. एस. आय, चौबे साहेब,  विकास पाटील, राहुल पाटील,प्रकाश पाटील, किरण पाटील, जगताप पाटील, बापू पाटील, नितीन सूर्यवंशी, सुनील पाटील, नगरपालिका कर्मचारी अनिल वाघ, भिकन गायकवाड, प्रशांत कंडारे, आदी अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन होते,