ब्रेकिंग न्यूज, पाचोरा, तीन दिवस लॉकडॉउन:कडेकोट बंद-प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांची माहिती!

0
482

आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)
ब्रेकिंग न्यूज, पाचोरा, तीन दिवस लॉकडॉउन:कडेकोट बंद-प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांची माहिती!

पाचोरा आणि भडगाव नगर परिषद हद्दीत दिनांक १९ मार्च ते २१ मार्च २०२१ या कालावधी मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविता याव्यात यांकरिता उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विशेष अहवाल सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद हद्दीमध्ये फक्त शहरी भागांमध्ये दिनांक 19 मार्च ते 21 मार्च 2021 या कालावधीमध्ये लॉक डाउन राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा आदेश थोड्याच वेळात निर्गमित होत आहेच. कृपया पाचोरा आणि भडगाव नगरपालिका हद्दीतील सर्व सन्माननीय नागरिक लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव व्यवसायिक परिसरातील शेतकरी बांधव यांनी याची नोंद घ्यावी.

सदर आदेश हा दूध खरेदी विक्री केंद्र, खाजगी व शासकीय वैद्यकीय स्थापना, औषध केंद्रे, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित अधिकारी-कर्मचारी तसेच दिनांक 21 मार्च 2021 या दिवशी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व  परीक्षेसाठी जाणारे परीक्षार्थी तसेच या परीक्षेसाठी सेवा वर्ग अधिकारी कर्मचारी यांना लागू असणार नाही. व पाचोऱ्यात सर्व आठवडे बाजार बाजारपेठा,किराणा दुकान इतर सर्व दुकाने, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र,शैक्षणिक संस्था शाळा,महाविद्यालय, खाजगी कार्यलय बंद राहतील तसेच हॉटेल रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी व पार्सल वगळता) सर्व बंद राहील त्याच बरोबर शॉपिंग मॉल्स मार्केट सलून, दारूची दुकाने गार्डन,पार्क, बगीचे सिनेमागृहे नाट्यगृहे व्यायाम शाळा जलतरण तलाव, क्रीडा स्पर्धा प्रदर्शने मेळावे,पान टपरी हातगाड्या उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद राहतील.

आज जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर

२१७ ,जळगाव, ग्रामीण ०३, भुसावळ ४२, अमळनेर ९१, चोपडा १८१ , पाचोरा ६५, भडगाव १९ , धरणगाव ७८,यावल ४० , एरंडोल ५५, जामनेर ६०, रावेर २१, पारोळा २८, चाळीसगाव ५९, मुक्ताईनगर २३, बोदवड ११ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकूण ९९६ रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण ५३२ बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६३५५९ रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या ८५५० ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ७३५७१ झालेली आहे. जिल्ह्यात आज ७ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १४६२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.