पाचोरा तिनं दिवसीय बंदला आज प्रतिसाद,

0
776

आरोग्य दूत न्यूज,
दि:-१९/३/२०२१
पाचोरा तिनं दिवसीय बंदला आज प्रतिसाद,

संपादक, एन एस भुरे (पाचोरा)

पाचोरा : आजच्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद व्यापारी दुकानदार व व्यावसायिक बंधुनतर्फे काटेकोरपणे पालन करुन पाचोरा शहरातील दुकाने बंद करून आपले योगदान देऊन कोरोनाच्या संघर्षमयी लढाईत सामील होताना पाचोरा मधील सर्वच बांधव दिसत आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक, रेल्वे स्टेशन रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया रोड, जामनेर रोड, बस स्टँड रोड, व सर्वच ठिकाणी शुकसुकाट दिसून आले. पोलीस प्रशासन मोलाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे, तसेच पाचोरा नगरपालिकेतील कर्मचारी या नियमांचे पालन न करणाऱ्या  बंडखोरान्वर कारवाई करून दंड वसूल करीत आहेत, यात मेडिकल्स, दूध, अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद दिसुन आले आहे.

     यावेळी डी. वाय. एस. पी. भारत काकडे साहेब, पी.आय. नजन पाटील साहेब, पी. एस. आय, गणेश चौबे साहेब, विकास पाटील, प्रकाश पाटील,राहुल पाटील, पो कॉ यशवंत बोरसे, हरेश्वर जगताप, सचिन पाटील,जगताप पाटील, बापू पाटील, नितीन सूर्यवंशी, सुनील पाटील, नगरपालिका कर्मचारी अनिल वाघ, भिकन गायकवाड, प्रशांत कंडारे, आदी अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन होते,