या केलेल्या सूचनांमध्ये एखादया  सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो,डॉ. दिपाली कुलकर्णी,

0
611

आरोग्य दूत न्यूज,
संपादक, एन एस भुरे (पाचोरा)

नमस्कार मी डॉ. दिपाली कुलकर्णी कोरोना वाढण्याची मुख्य कारण गर्दी आहेच  पण त्यापेक्षा देखील मोठी करणे मी आपल्याला खाली सांगत आहे कृपया जास्तीत जास्त लोकांना मध्ये शेअर करा अनेक नागरिकांना  याबाबतची पूर्ण माहिती नाही
1) आपण रस्त्याने चालताना मोटर सायकल चालवताना कारमध्ये बसल्यावर सगळीकडे मास्क वापरतो परंतु एकमेकांशी बोलताना मास्क तोंडाच्या खाली घेतो खाली घेतल्या  मुळे बोलताना  एकमेकाची थुंकी  तोंडावाटे बाहेर पडून  कोरोनाचा  100% प्रादुर्भाव होतो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि कोरोना  हा तोंडातल्या  थुंकीच्या च्या बारीक थेंब ( आपल्या डोळ्यांना न दिसणारे थेंब)मार्फत पसरणारा रोग आहे.
2) आपण कोणत्याही कार्यक्रमाला जाताना घरातून निघताना मास्क लावतो परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर मास्क काढून ठेवतो किंवा हनुवटीवर ठेवतो असे  का करतो आपण ?
3) समोरचा माणूस आपल्याशी बोलत असताना त्याने जर मास्क  खाली केलेला असेल तर त्वरित त्यापासून दोन ते तीन फूट मागे सरका  आपण स्वतः मास्क लावलेला असेल तरीसुद्धा कारण आपला मास्क सर्व साधारण प्रतीचा असतो
4) मास्क हा नाकाच्या  वरच असला पाहिजे कारण आपण श्वास नाकाद्वारे घेतो तोंडाने घेत नाही  नाकाच्या खाली मास्क  असल्यास त्याचा काहीही उपयोग नाही
5)कोरोणा चा विषाणू हा काहि  हवेमध्ये नाही  परंतु बंदिस्त जागेमध्ये बंदिस्त दुकानांमध्ये ऑफिस मध्ये  कार्यक्रम लग्न समारंभ ज्या ठिकाणी बरेच लोक मास्क खाली करून बोलत असतात अशा ठिकाणी कोरोनाचा विषाणू  हवे मध्ये 100% असतो
6) सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाहेर गेल्यावर हात धुतल्या शिवाय चेहर्‍याला हात लावू नका ही सवय आधी लावूनच घ्यायला हवी अगदीच नाईलाजास्तव चेहेऱ्याला हात  लावायचा असेल तर साबणाने  व्यवस्थित धुवून किंवा उत्तम प्रतीचे सॅनिटायजर  हाताला लावून मगच हात चेहऱ्याला लावा
7) बाहेरील सॅनिटायझर वर खुप भरवसा करू नका सॅनिटायजरची प्रत कशी आहे हे कुणालाही माहिती नसते हल्ली बाजारात निकृष्ट प्रतीच्या  सॅनिटायजरचा  चा खूप सुळसुळाट झालेला आहे अतिशय घाणेरड्या प्रतीचे सॅनिटायजर  दुकानांच्या बाहेर ठेवलेले असतात
8) आपले स्वतःचे चांगल्या प्रतीचे  सॅनिटायझरt(ब्रँडेड) विकत घ्या आणि नेहमी खीशात ठेवा
9) बोलत असताना समोरच्या माणसाला मास्क  तोंडावर लावून  बोला असे स्पष्टपणे सांगायला घाबरू नका
10) कोणत्याही डॉक्टर कडे अथवा हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी  गेल्यानंतर सगळ्यांपासून दूर रहा चांगल्या प्रतीचा मास्क वापरा
11) तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे करता दररोजचा व्यायाम व नियमित चांगला आहार हे तर  आपल्याला माहितीच असेल
मी वर केलेल्या सूचनांमध्ये एखादया  सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो
*नगरसेविका डॉ दिपाली कुलकर्णी
: 🙏🏻🙏🏻सहा महिने हे पाळाच

सोशल संबध टाळा
🤔सोशल मिडीयावर भेटा.

नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तुर्तास माया मोह टाळा.
🤔ही वेळ भावनिक नाहीतर वास्तविकता जाणून वावरण्याची आणि जगण्याची आहे.

∆  जवळचेच कोरोनाला जवळ आणून सोडतील, तेव्हा राग आला तरी चालेल स्पष्ट भेटण्यास येवू नका असे कळवा.
🤔तसेही स्पष्ट बोलणारे अतिशहाण्यांच्या मते वेडेच वाटतात.

अति गरजेचे असल्याशिवाय  आपण स्वत:हुन कोणाकडे जावू नका.
🤔कारण आता तुम्हाला छान वाटेल कोणाच्या घरी जायला पण तिथे कुणी रुग्णा आहे हे कळेल तेव्हा तुम्ही इच्छा असूनही मदतीला जावू शकणार नाही.

कोरोना कुणाच्या मदतीने केव्हा  घरात येईल सांगता येत नाही.

🤔तुमची एक चुक तुम्हांला आणि दुसऱ्याला महाग पडेल हे लक्षात ठेवा,जेव्हा कोणाला खरी गरज असेल तेव्हा तुम्हीही पाठ फिरवाल कारण हा विषाणू तसाच आहे,केव्हा होत्याच नव्हतं करेल सांगता येत नाही.

कोरोनाग्रस्त रूग्णांपासुन शारिरीक दुर व्हा मनाने मात्र जवळच रहा त्यांना आधार द्या आम्हि तुमच्या सोबतच आहोत याची ग्वाही द्या.
🤔कारण तेव्हा त्यांना तुमच्या खर्या मदतीची, प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे.

∆  ज्यांच्या घरात लहान मुले व ६० वर्षावरील माणसे आहेत यांनी विशेष काळजी घ्यावीच.
🤔 लहान मुलं आणि वयस्कर माणसांच्या घरात किंवा जवळही जावू नये,कारण त्यांना काही झाले तर तुम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.

  अति व फाजील आत्मविश्वास बाळगू नका.
🤔कारण फाजील आत्मविश्वास हा फाजीलच असतो,मला काही होणार नाही होत नाही होवूनही गेला गेला असेल हे फालतू वक्तव्य बंद करा.जगा आणि जगू द्या आणि मरायची हौसच असेल तर कोरोनाची वाट कशाला बघताय.
कसला कोरोना होतोय अशी बेजबाबदार भाषा अलिकडे दिसु लागली आहे.अशा लोकांना आवरा त्यांना टाळा किंवा समजावा.
🤔ज्याची भाषाच बेजबाबदार त्याला समाज किंवा परिवार याची जबाबदारी काय कळणार.सजग नागरिक म्हणून जगायला शिका.

∆  हात देणे अलिंगण देणे गळ्यात पडुन रडणे.लहान मुलांचा पापा घेणे देणे टाळाच. बंद करा.
🤔 थोडेदीवदिवस गळ्यात नाही पडले तर काय होईल,नका ना घेवू लहान मुलांना जास्त जवळ, जेणेकरुन त्यांना तुमच्या कडून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या.

∆   जिथे गोतावळा तेथे रमतो कोरोना.
🤔हे आज जरी खोट किंवा गमतीशीर वाटत असेल तरी ते कस खरं आहे हे पटण्यासाठी विषाची परीक्षा नका नां घेवू.

∆  जर अकारण कुणी आपल्या घरी येणे जाणे करत असेल तर प्रेमाने महत्व समजून सांगा.
🤔बाबारे तु तुझ्या घरी सुखी रहा आम्हांला आमच्या घरात सुखी राहू दे.खर म्हणजे तु जग आम्हाला जगू दे.

∆  भिडस्तपणा अंगाशी येण्याचीच शक्यता जास्त आहे.
🤔भिडस्तपणा अंगाशी येईपर्यंत नका ना वाट बघु,कदाचित् तोवर उशीर झालेला असेल किंवा वेळ निघुन गेलेली असेल.
कमी सदस्य असलेली घरे सुरक्षित आहेत.
🤔आतातरी हेच सुरक्षित आणि सुशिक्षित पणाच लक्षण आहे.जिथे होते गर्दी तिथे कोरोना लावतो आपली वर्दी (हजेरी).

  वरील सर्व कठीण आहे पण सर्वासाठी ते आवशक आहे.
🤔कारण तुमच्या आजूबाजूला कधीही, केव्हाही,कुठेही तो येवून शिरकाव करु शकतो.

पोलीसानी डाॅक्टरांनी नर्सेसनी आपले जीवन धोक्यात घालून आपणास वाचवले आहे वाचवत आहेत तेव्हा आपण स्वत:हून आपली काळजी घ्या.
🤔तुम्हाला स्वतःची काळजी नसेल तर जावूद्या,पण दुसऱ्याच्या जिवावर उठू नका.
∆  प्रतीकार शक्ती वाढेल असेच अन्न सेवन करा.
🤔 तुम्हाला सोसेल तेवढच पण पौष्टिक खा.
जीभेचे चोचले थांबवा
🤔 आणि आजारपण लाबंवा.

∆  जगाल तरच जगवाल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🤔वैचारिक संघर्ष फक्त कोरोनाशी आहे,
वैयक्तिक कुणा माणसांशी नाही…..,,🤔