आरोग्य दूत न्यूज,
संपादक एन एस भुरे (पाचोरा)
२०/३/२०२१
जेसी आय पाचोरा च्या वतीने पोलीस बांधवाना शितपेयचे वाटप
जेसीआय क्लब पाचोरा तर्फे रणरणत्या उन्हातही जनता कर्फ्यु मध्ये सेवा देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शीतपेय वाटप करण्यात आले. पाचोरा पोलिस स्टेशन मध्ये जाऊन प्रभारी अधिकारी श्री. किसनराव एल नजन (पोलीस निरीक्षक) विकास पाटील ( उप निरीक्षक) गणेश चौबे (उप निरीक्षक) दत्तात्रय नलावडे (उप निरीक्षक), राहुल बेहेरे इतर सर्व पोलिस बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भर दुपारी १२ वाजता ऊन्हात शीतपेय (भारत डेअरीची प्रसिद्ध लस्सी) वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रमुख चौकमध्ये ड्यूटी वर असणाऱ्या पोलिस बाधवाना शीतपेय वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मयुर दायमा आणि डॉ. आनंद जैन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष जेसी प्रा. मयुर दायमा, सचिव जेसी रोहित रिझानी, प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी अंकित अग्रवाल, जेसी गोपाल पटवारी, जेसी पियूष संचेती, डॉ आनंद जैन, राहुल जैन, आबा देव, अभिषेक जैन, रोहित अग्रवाल, पियूष अग्रवाल, ललित जैस्वाल यांच्यासह आजी – माजी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचोरा पोलिस स्टेशन सर्व कर्मचारीवृंद तसेच जेसीआय चे माजी प्रांतपाल गोपाल पटवारी, जीवन जैन आणि रितेश ललवाणी याचे विशेष मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाशेवटी रोहित रिझाणी यांनी आभार मानले.