शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी पाचोरा कॉग्रेस चे उपोषण

0
295

आरोग्य दूत न्यूज,
एन एस भुरे (संपादक)

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी पाचोरा कॉग्रेस चे उपोषण

पाचोरा (प्रतिनिधी) – देशात दिल्ली च्या बॉर्डर वर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असुन झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज भारत बंद पुकारला होता याला पाठिंबा म्हणून आज पाचोरा कॉग्रेस ने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

शेतकर्‍यांचा विरोधात तिन काळे कायदे त्याच सोबत वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल चे वाढते भाव याच्या विरोधात देशात कॉग्रेस ने शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले व जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आले. पाचोरा कॉग्रेस ने आज तहसील कार्यालया परीसरातील कॉग्रेस कार्यालया समोर शहर कॉग्रेस व तालुका कॉग्रेस सह जळगाव जिल्हा सोशल मीडिया च्या वतीने एक दिवसीय उपोषण तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी    ऐंशी वर्षाचे  जेष्ठ पदाधिकारी दिनकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, महिला वकील संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड मनिषा पवार, अॅड. अण्णासाहेब भोईटे,अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्षा क्रांती पाटील, तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, आबा पाटील, संतोष पाटील, रवी पाटील, परदेशी, शिव प्रसाद थेपडे, दिलीप पाटील, किशोर शिरशाठ, बबलु पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नायबतहसिलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले