ऑक्सिजन संपल्याने ; रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप,रुग्णांचा मृत्यू

0
887

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)

ऑक्सिजन संपल्याने ; रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप,रुग्णांचा मृत्यू

चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री तीन वाजेपासून ऑक्सिजन संपल्याने ; रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप दिसून येत होता , सदर बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने तालुक्याचे तहसीलदार अनिल गावीत यांनी

सकाळीच उपजिल्हा रुग्णालयात हजेरी लावली त्यावेळी रुग्णांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्या समोर कैफियत मांडली त्यावेळी त्यांनी अधिक तपास करून निर्णय घेऊ असे नातेवाईकांना सांगितले पण परंतु अजूनही काहीचनिर्णय घेतला नाही .
येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने काही रुग्ण दगावल्याचे देखील नातेवाईकांनी आपली कैफियत तहसीलदार अनिल गावित यांच्या कडे बोलून दाखविली यावेळी तहसीलदार अनिल गावित यांनी चौकशी करून निर्णय घेतो असे सांगितले मात्र दुपार पर्यंत कोणताही निर्णय घेतला नव्हता. रुग्णाचा नातेवाईकामध्ये मात्र संताप दिसत होता .
सविस्तर असे की, दि. २६ मार्च रोजी रात्री २ ते ३ वाजेपासून ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने ३ वाजेपासून उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनवर ५५ रुग्ण ऍडमिट आहेत असे डॉ मनोज पाटील यांनी बोलतांना सांगितले. ते सर्व रुग्ण रात्री ३ वाजेपासून विना ऑक्सिजन वर होते त्यातून ४ ते ५ रुग्ण दगावल्याचे नातेवाईकानी तहसीलदार अनिल गावित यांना सांगितले. आणि याबाबतचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर फिरत आहेत तेच व्हिडीओ तहसीलदार अनिल गावित यांनाही दाखविण्यात आले आहेत यावर मात्र दुपार पर्यंत तहसीलदार अनिल गावित यांनी काहीच निर्णय घेतला नव्हता.त्यामुळे चोपड्यातील रुग्णाचे हाल कडे कोणीही लक्ष देत नाही शासन, प्रशासन मात्र सुस्त आहे , उपजिल्हा रुग्णालयात अधिक कानोसा घेतला असता डॉक्टरांचा स्टॉप, नर्स कमी पडत असून जवळपास १९० रुग्ण ऍडमिट असून त्यात ५५ रुग्ण हे ऑक्सिजन वर असून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा देखील कमी प्रमाणात होत असल्याने असे झाले असेल असे बोलले जात आहे मात्र याला जबाबदार कोण ? तरी चोपडा तालुक्यातीची स्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी सदर घटनेत लक्ष दयावे अशी मागणी नातेवाईक करतांना दिसत होते .
खासदारानी लक्ष दयावे–
चोपडा मतदारसंघातुन खासदार रक्षाताई खडसे यांना हजारोचा लीड दिला आहे यांनी तरी लक्ष देऊन आरोग्य व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी जनतेतुन होत आहे…..

रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाही- डॉ मनोज पाटील
दि २७ रोजी पहाटेच्या सुमारास उपजिल्हा कोरोनामुळे ज्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला तो ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नसून त्यांची तब्येत खालावली असल्यामुळे झाला आहे. याबाबतची पूर्व कल्पना रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती.तरी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी खोटी असून उपजिल्हा रुग्णालय रुग्णाची काळजी घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ मनोज पाटील ‌याांनि साांगितले.