पाचोरा येथील अजय विसपुते या युवकाने रांगोळीतुन साकारले विघ्नहर्ता

0
525

पाचोरा येथील अजय विसपुते या युवकाने रांगोळीतुन साकारले विघ्नहर्ता

आरोग्य दूत न्यूज

एन एस भुरे (संपादक)

बाहेर कोरोना पसरल्यामुळे आज विद्यार्थी घरीच बसून आहे, पण काही विद्यार्थीमात्र वेळेचा सदुपयोग म्हणून आपल्या कला देखील जोपासत आहेत.
पाचोरा येथील साई पार्क मधील अजय पांडुरंग विसपुते या विद्यार्थ्यांने घरीच रांगोळी तून गणपती बाप्पा साकारले आहेत.
*सदर रांगोळी 5 × 4 असे असून रांगोळी नसून हुबेहुब गणपती बाप्पा आपल्या समोर आले की काय असा भास होतो काळा आणि पांढरा या रंगांच्या विविध छटेतून श्रींचे रूप साकारले आहे.शरीरावरील कापडाचा इफेक्ट नाजूक अन चमकदार भासतो आहे.फेट्याचा कापड बांधणीच्या कापडाचे रूप दाखवत आहे. डोळ्यांमधील चमक आणि स्किन टोन खूपच सुंदर चित्रित केलेला दिसतोय. या पूर्वी त्याला सारंगखेडा येथील अश्व चित्र स्पर्धा चेतक फेस्टिव्हल मध्ये 5000 रु बक्षिसाने सन्मानित केलं आहे.जलरंगात ही त्याचा हातखंडा आहे
अजय हा तेलंगणा हैद्राबाद येथे देखील जाऊन आपली कला (रांगोळी)सादर करून आला आहे
अजय आता गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट औरंगाबाद येथे उर्वरित शिक्षण घेत आहेत, तसेच अजय रंगश्री आर्ट फाऊंडेशन श्री. सुबोध कांतायन सर यांचा देखील विद्यार्थी आहे.