आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
३/४/२०२१
पाचोरा तालुक्यातील शिंदाड व पिंपळगाव हरे. या गावात तातडीने शासकिय कोविड उपचार
केंद्र सुरु करणे बाबत आज शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अॅड अभय पाटिल यांच्या नेतृत्वात आमदार किशोर पाटिल यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, देशासह महाराष्ट्रात व पर्यायाने आपल्या तालुक्यात करोना या
आजाराने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला असुन आपल्या तालुक्यातील शिंदाड व पिंपळगाव हरे. या दोन
गावात मुख्यत्वे करोना या आजाराने जास्त बळी घेतले आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तसेच आपण शहरात घरापासुन दुर मोठ्या रुग्णालयात अॅडमिट झालो तर या आजारात आपला मृत्युच होईल या
चुकीच्या मनाच्या समजुतीमुळे देखील करोना रुग्ण अत्यावस्थ होवुन मृत्युला सामोरा जात आहे. ही बाब
लक्षात घेता आपणास नम्र विनंती की, आपण तातडीने आमच्या शिंदाड व पिंपळगाव हरे. या दोन मोठ्या गावांमध्ये अतितातडीने शासकिय कोविड उपचार केंद्र सुरु करावे. जेणेकरुन आमच्या गावातील वाढती कोविड रुग्ण पाहता गावातच रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचतील व गावातच उपचार मिळतात हे पाहुन मनातील अनावश्यक भिती देखील कमी होईल. तरी आपणास विनंती की, आपण तातडीने आमच्या शिंदाड व पिंपळगाव हरे. या दोन मोठ्या गावांमध्ये अतितातडीने शासकिय कोविड उपचार केंद्र सुरु करावे. आवश्यकता वाटल्यास आपल्या मार्फत शासकिय निधीतुन आवश्यक ते साहीत्य देखील उपलब्ध करुन देण्याची कृपा करावी हि विनंती करण्यात आली.निवेदन देतांना पिंपळगावचे शिवसेनेचे रवी गिते,दिलिप जैन,अल्लाउद्दिन तडवी व बी.डी.पाटिल आदी उपस्थित होते.