पाचोरा – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाचोरा तालुका अध्यक्ष पदासाठी सचिन सोमवंशी यांची निवड केली आहे
आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
४/४/२०२१
पाचोरा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून कॉग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले पुर्वाश्रमीचे पत्रकार सचिन सोमवंशी यांची पाचोरा तालुका अध्यक्ष पदासाठी निवड नुकतेच अधिकृत झाली आहे. पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तेथे कॉग्रेस असा संकल्प घेऊन कॉग्रेस पक्षाला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गतवैभव प्राप्त करुन द्यायचा असुन. प्रत्येक गावपातळीवर निष्ठावान कार्यकर्त्यांची दखल घेतली जाईल तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असुन सरकारच्या योजना गावपातळीवर नेण्यात येतील. सरकार आपल्या दारात असाही उपक्रम राबविण्यातचा मानस असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले
श्री. सोमवंशी यांच्या निवडीचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, सरचिटणीस अजबराव पाटील, जमील शेख, विकास वाघ, इस्माईल फकीरा शेख, अॅड अमजद पठाण, प्रताप पाटील, शरीफ खाटीक, राजेंद्र महाजन, प्रा. एस. डी. पाटील, डींगबंर पाटील, महिला आघाडीच्या अॅड. मनिषा पवार,संगीता नेवे, कुसुम पाटील, क्रांती पाटील, आंदीनी अभिनंदन केले आहे