आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
८/४/२०२१
होम क्वारंटाईन केलेली लोकं पाच ते सात दिवसात बाहेर पडुन सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
होम क्वारंटाईन केलेली कोवीड पेशंट ही 14 ते 17 दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात नाही आली पाहिजे.कोवीड पाॅजीटिव पेशंट हा 12 ते 14 दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवु शकतो.मला काही लक्षणं नाहीत,मी आता बरा आहे,मला काहीच त्रास नाही होत,मला दम पण नाही लागत,माझं सॅच्युरेशन ही नाॅर्मल आहे अशी कारणं सांगत 5 ते 7 दिवसात घराच्या बाहेर पडुन सुपरस्प्रेडरची भूमिका निभावतआहेत.प्रशासनाला, सरकारला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रशासनाला काय मदत करु शकतो हा विचार करा.सरकार, प्रशासन त्याच्या लेवलवर पूर्णपणे काम करतंय,आपण उत्तम नागरिक म्हणून प्रशासनाच्या पूर्णपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे.होम काॅरंटाईन पेशंट ने चौदा दिवस घरात आयसोलेशन मध्ये राहुन प्रशासनाला मदत केली पाहिजे व सुपर स्प्रेडर म्हणून बाहेर नाही पडलं पाहिजे.सुपर स्प्रेडर स्वतःच्या परिवारासाठी ही घातक आहेत व समाजासाठी पण.होम काॅरंटाईन कोवीड पाॅजीटिव्ह असलेल्या नागरिकांनी एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून व प्रशासनाला आपली मदत म्हणुन खारीचा वाटा उचलुन सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरु नका व आपला 14 ते 17 दिवसांचा होम क्वारंटाईन पीरियड घरात राहुन पुर्ण करा.