आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि-१०-४-२०२०
पाचोरा-येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या अनोख्या उपक्रमाने शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना आता अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळणार आहे.सद्यस्थितीत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातल्याने सर्वत्र लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्या परिस्थिती मध्ये आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणलेल्या शेतकऱ्याला उपाशी राहुन आपला शेतीमालाचा लिलाव होई पर्यंत तातकळत बसावे लागते अश्या परिस्थितीत व्यापारी असोसिएशनने पुढाकाराने येथे दहा रुपयांत जेवण देण्यात येत आहे. असा अभिनव उपक्रम राबवणारी पाचोरा बाजार समिती ही जिल्ह्यातील पहिली बाजार समिती असुन या उपक्रमाबद्दल येथील व्यापारी बांधवांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.या उपक्रमाचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करून खरेदी असोसिएशनचे अध्यक्ष रमेशशेठ अग्रवाल, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीत ते पार पडले यावेळी भरतशेठ शेंडे, सुभाषशेठ अग्रवाल,अतुलशेठ सावा, बाजार समिती सचिव बी.बी.बोरुडे, सुखदेव आण्णा पाटील,निखिलशेठ बडोला,चेतनशेठ गौड,भुषणशेठ बोथरा, प्रतिकशेठ मोर,मनोजशेठ सिसोदिया, योगेशशेठ संघवी, प्रकाशशेठ बांठीया, गोविंदभाऊ देवरे,लिलाव सुपरवायझर आर.बी.पाटील,व बाजार समिती कर्मचारी वृंद व हमाल मापाडी बांधव उपस्थित होते.