पाचोरा, कोरोना महामारीत रक्ताचा तुडवडा : रक्तदान शिबीर साठी कॉग्रेस मैदानात

0
423

कोरोना महामारीत रक्ताचा तुडवडा : रक्तदान शिबीर साठी कॉग्रेस मैदानात
आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे
16/4/2021
पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना महामारी दैनंदिन वाढत आहे. अशातच रक्ताचा तुडवडा होऊ लागल्याने रक्तदान शिबीरासाठी पाचोरा कॉग्रेस मैदानात उतरले आहे.
कोरोना महामारीत रक्त देणारे दाते बोटावर मोजण्या इतके असतात त्यामुळे रक्तदान महत्त्वाचे असते. म्हणून महाराष्ट्रभर दोन लाख रक्तपिशवी जमविण्याचा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संकल्प केला आहे. जिल्हा अध्यक्ष अॅड. संदीप  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन येधील नवकार प्लाझा येथे करण्यात आले.  जवळपास पन्नासहुन अधिक दात्यांनी रक्तदानाचे दातृत्व दाखविले. कॉग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी देखील रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाण पत्र देण्यात येऊन भविष्यात केव्हाही त्या दात्याला स्वतः साठी रक्ताची आवश्यकता भासल्यास मोफत आहे.  रक्तातील नात्यातील लोकां कडून अर्धे पैसे घेतले जाईल. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा महीला उपाध्यक्षा संगिता नेवे, महीला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, रेडप्लस ब्लडबँकचे डॉ. भरत गायकवाड, अमोल शेलार, दिपक पाटील, रविंद्र पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.