मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केवळ ५ दिवसात पुण्यात ४० ऑक्सिजन बेड्स आणि ४० होम आयसोलेशन बेड्स उभारल्यानं सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

0
537

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)

पुणे – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केवळ ५ दिवसात पुण्यात ४० ऑक्सिजन बेड्स आणि ४० होम आयसोलेशन बेड्स उभारल्यानं सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत नगरसेवक वसंत मोरे म्हणतात की, ५ दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते, तर आज संपूर्ण पुणे शहरात १ हजार ६८० बेड तयार झाले असते आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो असं त्यांनी सांगितले.