गोंदेगाव ता.सोयगाव, हसत्‍या खेळत्‍या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलासह वडिलांचा मृत्यू, तर एका दिवसांचा जन्मलेला मुलगा करतोय मृत्यूचा सामना

0
1411

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि-२०/४/२०२1

गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर)  : हसत्‍या खेळत्‍या परिवाराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले आणि कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलासह वडिलांचा मृत्यू, तर एका दिवसांचा जन्मलेला मुलगा मृत्यूशी झुंज देत असल्याची मन सुन्न करणारी घटना तितुर (ता.सोयगाव) येथे रविवारी (ता.१८) घडली आहे. वडील भगवान पंडीत खैरनार (वय ५६), मुलगाराहुल भगवान खैरनार (वय ३०, रा.तितुर) असे मृतांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. सोयगाव तालुक्यात कोरोनाचा संक्रमण वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. तालुक्यात रुग्णसंख्या ३०० पार गेली असुन मृत्युच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे. गोंदेगाव येथे चार जण, तर हनुमंतखेडा येथे आठ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
तितुर येथील एकाच कुटुंबातील दोन जणांचा बळी घेतला आहे. तितुर येथील भगवान पंडीत खैरनार (वय ५५) यांना कोरोनाची लागण झाल्याने पाचोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु दोन दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला. नंतर संसर्गामुळे मुलास देखील कोरोना झाल्याने प्रथम उपचारासाठी पाचोरानंतर चाळीसगाव. परंतु प्रकृती जास्त खराब असल्याने औरंगाबाद येथे घेऊन जात असताना सोमवारी (ता.१९) पहाटे राहुलचा देखील मृत्यु झाला. अवघ्या दोन दिवसांत पिता पुत्राचा कोरोनाने बळी घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यातच राहुलच्या पत्नीस रविवारी (ता.१८) प्रसुतीसाठी पाचोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असता एका गोंडस मुलास जन्म दिला. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. मुलास जन्मताच ऑक्सिजन पुरवठा आवश्यक होता. मात्र पाचोरा येथील एकाही रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने जवळील चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे एक दिवशीय मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. तर सासरा, पती आणि मुलाच्या विरहाने पत्नीची देखील तब्येत खालविली असुन तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दुसर्‍या टप्प्यात प्रभाव वाढला : तितुर येथे गेल्या वर्षी अवघे तीन जण कोरोना बाधित होते. तर दुसऱ्या लाटेने तर संपुर्ण गावावर वर्कदुष्टी पडली पडल्याने सात जणांचा मृत्यु झाला असून पन्नास जण कोरोनाशी लढत आहे.