प्रराज्यातून येणारे पाचोरा रेल्वे स्टेशन वर रॅपिड टेस्ट करूनच पाचोरा येथे प्रवेश राहील.

0
512

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव यांचेकडील दिनांक 20/04/2021 रोजीच्या आदेशान्वये
पाचोरा रेल्वे स्टेशन येथे आज दिनांक 22/04/2021 पासून पाचोरा रेल्वे स्टेशनवर रेल्वेने परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची Rapid Antigen Test केल्याशिवय शहरात प्रवेश न देण्यासाठी विशेष कॅम्पची सुरूवात
करण्यात आली आहे. सदरचे कॅम्पचे आयोजन तालुका वैद्यकिय अधिकारी पाचोरा, वैद्यकिय अधिक्षक,ग्रामीण रूग्णालय पाचोरा, नगरपरिषद पाचोरा व रेल्वे प्रशासन पाचोरा यांचे संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यांत आले आहे. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी श्री. प्रकाश
भोसले, उपस्थित होते. Rapid Antigen Test करणेसाठी शहरी आरोग्य कर्मचारी श्रीमती भारती पाटील,
श्रीमती बनिता जाधव, श्री, आकाश ठाकूर हे कर्मचारी उपस्थित होते. त्यांना मदतनीस मणून नारपरिषदेचे कर्मचारी श्री. शामकांत अहीरे, श्री. शरीफ खान हे उपस्थित होते. तसेच रेल्वे प्रशासनाचे मनोज सोनवणे,टी.सी. व श्री. कृष्णा शर्मा, R.P.F. हे देखील उपस्थित होते. आज रोजी 10 रेल्वे प्रवाशांची तपासणी करण्यांत
आली असून त्यामध्ये 1 प्रवासी हा POSITIVE आढळून आलेला आहे.