पाचोरा:-नंदू शेलार युवा मंच तर्फे सोडियम हायपो क्लोराईट ची फवारणी केली. तसेच मास्क चे वाटप

0
411

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि:-२५/४/२०२१
पाचोरा:-नंदू शेलार युवा मंच तर्फे सोडियम हायपो क्लोराईट ची फवारणी केली. तसेच मास्क चे वाटप
पाचोरा:-नंदू शेलार युवा मंच तर्फे पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये कोरोना आळा घालण्यासाठी नंदू भाऊ शेलार युवा मंचचे अध्यक्ष नंदू भाऊ यांच्या पुढाकाराने सूक्ष्म जंतुनाशक सोडियम  हायपो क्लोराईट औषधाची ची फवारणी मिलिंद नगर, जय भवानी नगर, हनुमान वाडी, गणेश कॉलनी, आशीर्वाद ड्रीम सिटी या भागात घरोघरी जाऊन करण्यात आली. नंदू भाऊ शेलार यांनी सांगितले की वाढदिवसानिमित्त अनेक जण मोठे मोठे कार्यक्रम साजरे करून लाखो रुपये खर्च करीत असतात परंतु संपूर्ण देशात आज राज्यात शहरात कोरोना हाहाकार माजविला असून अशा बिकट परिस्थितीत आपण नव्हे तर शहर व तालुक्यात साठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने आपण नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून सोडियम हायपो क्लोराईट ची फवारणी आपण करत आहो त असे नंदू भाऊ शेलार युवा मंचचे अध्यक्ष नंदू भाऊ यांनी सांगितले . प्रभागातील सर्व नागरिकांनी नंदू भाऊ शेलार यांच्या या उपक्रमाबद्दल स्वागत करून अभिनंदन केले अनेक लोकप्रतिनिधी अजून नागरिकांच्या आरोग्यासाठी या प्रभागात फिरकले देखील नाहीत पण नंदू भाऊ शेलार युवा मंच ने आपले काम उत्तम प्रकारे सुरू ठेवलेले आहे याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले . सूक्ष्मजंतू निर्जंतुक करणेसाठी उत्तम पर्याय आहे असे शेलार यांनी सांगितले . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा संदीप दादा पवार , तसेच नंदू भाऊ शेलार या मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

नंदु शेलार युवा मंच तर्फे  मास्क चे वाटप

पाचोरा शहरातील नंदू भाऊ शेलार युवा मंच तर्फे कोरणा ला आळा घालण्यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील मिलिंद नगर , हनुमान वाडी, जय भवानी नगर या ठिकाणी घरोघरी जाऊन नंदू भाऊ शेलार युवा मंच अध्यक्ष नंदू भाऊ शेलार यांनी  प्रामुख्याने तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडणाऱ्या व्यक्ती , पोलीस कर्मचारी, वृद्ध वयस्कर व गरजू लोकांना मास्क व सँनिटायझरचे चे वाटप केले. अनेक व्यक्तींकडे माक्स नसल्याचे दिसून आले त्यातही गरजू नागरिक मोठ्या संख्येने होते. त्यामुळे समाजाची गरज लक्षात घेऊन शेलार यांनी शहरास देशासह शहरात कोरणा ने आहाकार माजवला असून अशा बिकट परिस्थितीत आपण देशासाठी नव्हे तर  प्रभागातील नागरीकांसाठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून मास्क व सँनिटायझरचे चे वाटप  केले . यावेळी माक्स  घेतलेल्या व्यक्तींनी समाधान व्यक्त केले या  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संदीप पवार , नंदू शेलार युवा मंचचे कार्यकर्ते राहुल, दादा, उमेश ,भूषण, पवन,बंटी, जॅकी, दीपक आकाश ,राहुल मोठ्या संख्येने उपस्थित होते