पाचोरा-आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी दिला राजीनामा

0
1196

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
१/५/२०२१
आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी दिला राजीनामा

पाचोरा-येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आसनखेडा येथे भाजपा पुरस्कृत एकता पॅनल विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी पुरस्कृत महाविकास आघाडी पॅनल मध्ये सरळ लढत झाली होती एकूण नऊ सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाच्या एकता पॅनला दोन व महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला एक जागा बिनविरोध करण्यात आल्या होत्या त्यानंतर प्रत्यक्ष उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा प्रणीत पॅनलने चार तर महाविकास आघाडी प्रणित पॅनेलने दोन जागांवर विजय मिळविला होता परंतु सरपंच पदाचे आरक्षण ना.मा.प्र.महिला निघाल्यानंतर महा विकास आघाडी पुरस्कृत पॅनलने भाजपा प्रणीत पॅनलच्या दोन सदस्यांना सोबत घेऊन फोडाफोडीचे राजकारण करत महाविकास आघाडीचा सरपंच बनवून सत्ता स्थापन केली होती. परंतु या सत्तास्थापनेला अवघघे अडीच महिने होत नाही तोच भाजपा प्रणीत पॅनलच्या १) उषाबाई रवींद्र पाटील २) वीरेंद्र रामकृष्ण पाटील ३) पूजाबाई अमोल गायकवाड ४) मंगलाबाई अशोक पाटील ५) धनराज निंबा मोरे या पाच सदस्यांनी दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी सकाळी आसनखेडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवक शरद पाटील व सरपंच इंदिराबाई बबनराव पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला असून तालुक्यात सर्वत्र याबाबतीत चर्चा सुरू आहे. राजीनामा देणाऱ्या भाजपा प्रणीत पॅनलचे सदस्यांना याबाबतीत विचारणा केली असता आसनखेडा गावात सरपंच यांनी मनमानी कारभार सुरू केला असून गावातील विकास कामे व इतर नागरिकांच्या समस्या सोडविणे याबाबत त्यांच्याकडे वारंवार सांगून देखील ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असत तसेच समस्या सोडवण्याऐवजी चुकीच्या गोष्टींना ते पाठराखण करीत असत व कोरोना सारख्या महामारी मध्ये गावात रुग्ण संख्या वाढत असताना कुठलेही नियोजन नाही व उपाययोजना नाहीत अशा नियोजन शून्य कारभारामुळे गावातील जनतेला त्याचा परिणाम भोगावा लागत होता जनतेने आम्हाला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडून दिले असून जर त्या समस्या वारंवार सांगून देखील सुटत नसतील तर आम्ही सर्व भाजपा प्रणित एकता पॅनलचे सदस्य राजीनामा देत आहोत असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले परंतु नऊ सदस्य असणाऱ्या आसनखेडा ग्रामपंचायतीतील पाच सदस्यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते  त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. तसेच महाविकास आघाडी प्रणित पॅनल चे सरपंच पद जाणार असल्याच्या देखील चर्चा यावेळी होत असताना दिसत आहेत. तसेच असे झाल्यास आसनखेडा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक केली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.