पाचोरा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

0
337

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि-३/५/२०२१

पाचोरा – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या आदेशानुसार  जिल्हा व तालुका स्तरावर जनतेच्या अडचणी व समस्यां जाणून घेण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱयांची आढावा बैठका घेण्याचे येत आहे. पाचोरा मतदार संघातील  बैठक जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांच्या व माजी आमदार दिलीप वाघ, माजी आ.मनिष जैन, न.पा.गट नेते संजय वाघ, जिल्हा पदाधिकारी रवींद्र नाना पाटील,अरविंद मानकरी,अशोक लाडबंजारी, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी आदींच्या उपस्थितीत श्री. वाघ यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी पाचोरा- भडगाव  शहर-तालुक्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या  करण्यात आल्या. बैठकीला मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले कि, कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर आहे.  लोकांनी नियमांचे पालन करावे तरच आजारावर नियंत्रण होईल. संकटात एकमेकांना साथ  द्या.हे वर्ष आरोग्य जोपासण्याचे वर्ष म्हणून पाळा. पक्ष संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी जनतेसाठी कार्य करावे. राज्य सरकारच्या वतीने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू केले आहे. लोकांनी लसीकरण करावे.आघाडी सरकार उपाययोजना राबवित आहे. राज्य सरकार जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही .बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोरोना आपत्तीत जनता आरोग्य  सुविधांची मागणी करीत आहे.. अश्या वेळी जनतेचे सहकार्य करावे. यावेळी खलील देशमुख, विकास पाटील, प्रा.भागवत महालपुरे, श्याम भोसले, अभिजित पवार, पंकज गढरी, राजू परदेशी, सुभाष पाटील, विजय कडू, सतिष चौधरी, अरुण पाटील, रणजित पाटील, अझर खान , शशी चंदिले, बाबाजी ठाकरे, प्रदीप वाघ , उमेश एरंडे, सुदर्शन सोनवणे,संदीप महालपुरे, शिवदास पाटील, डॉ.शेख, डी.डी.पाटील, महिला पदाधिकारी योजना पाटील, सौ.सुचेताताई वाघ, मंगला शिंदे, सुनीता देवरे, सरला पाटील , रेखाताई पाटील (भडगाव) सुनीता मांडोळे आदींची उपस्थिती होती. सूत्र संचालन व आभार तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी केले.(फोटो कॅप्शन- बैठकीला मार्गदर्शन करतांना ऍड.रवींद्र पाटील, मा.आ.दिलीप वाघ, मा.आ.मनिष जैन,संजय वाघ, वंदना चौधरी आदी)