पाचोरा-ग्रामीण रूग्णालयात ऑक्सीजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.( डॉ.अमित साळुखे )

0
728
  1. आरोग्य दूत न्यूज

एन एस भुरे (संपादक)

पाचोरा-ग्रामीण रूग्णालयात ऑक्सीजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.( डॉ.अमित साळुखे )

आज  दि .04.05.2021 रोजी ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे एकूण 30 कोविड संसर्गित रुग्ण उपचारार्थ दाखल असून त्यापैकी 24 रुग्ण हे ऑक्सीजन वर असून 3 रुग्ण हे व्हेंटीलेटर वर आहेत . ग्रामीण रुग्णालयात एकूण 30 ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध असून त्यापैकी आजरोजी 13 सिलेंडर भरलेले असून 4 सिलेंडर हे कार्यरत आहेत . ग्रामीण रूग्णालयात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध असून ऑक्सीजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही . ऑक्सीजन सिलेंडर संपण्याच्या अगोदरच मा.जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव यांचेकडून तात्काळ ऑक्सीजन पुरवठा होत आहे . तरी पाचोरा तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की , ऑक्सीजन साठा संपलेला आहे व त्यामूळे रुग्णंचा मृत्यू होत आहे अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये . ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन साठा उपलब्ध असून व नियमित ऑक्सीजन साठा प्राप्त होत आहे . तसेच सर्व दाखल असलेल्या कोविड संसर्गित रुग्णांची योग्य प्रकारे देखभाल केली जात आहे . ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे मागील 1 वर्षापासून सुमारे 469 कोविड संसर्गित रुग्णांचा उपचार करण्यात आलेला असून त्यापैकी 433 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेले आहेत . ग्रामीण रुग्णालयाचा कोविड संसर्गित रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट सुमारे 93 टक्के आहे जो की जळगाव जिल्ह्याच्या सरासरी रिकव्हरी रेट पेक्षा जास्त आहे .