आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि-५/५/२०२१
“बूलाती है, मगर जाने का नहीं”
(निता कायटे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन)
सदया उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि नेहमी प्रमाणे अल्पवयीन मुली पळून जाण्याच प्रमाण वाढत आहे. तर मुलांनो सावधान, तुम्हाला एखादी मूलगी आवडत असेल किवा तुमचे तिच्यावर प्रेम असेल तर खबरदारी घ्या. एखाद्या दिवशी मूलीचा तुम्हाला फोन येतो आणि ती तुम्हाला सांगते की, मला आईबाबा खूप त्रास देत आहेत, आता मला आईवडिला सोबत राहायचे नाही. तू मला घ्यायला ये नाहीतर मी माझ्या जिवाचे काहीतरी बरेवाईट करून घेईन, तर मूलगा लगेच गाडी घेवून मूलीला घ्यायला जातो. तिला घेवून कुठेतरी नातेवाईकांकडे किवा कुठेतरी रूम करून ठेवतो. तिथे त्यांच्यात शारिरीक संबंध होतात. इकडे मूलगी पळून गेल्याने तिचे आईवडिल तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात. मूलगी १८ वर्षे वयापेक्षा कमी असल्याने कलम 363 भारतीय दड विधान अन्वये मूलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा FIR पोलीसाना नोंद करावा लागतो. इथे मूलगी स्वतःहून घरून निघून गेली तरि अपहरणाचा गुन्हा नोंद करावा लागतो, कारण मिसिंग मूलगी अल्पवयीन आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांचा तपास सुरु होतो. मूलगा आणि मूलीचा शोध घेवून त्यांना पोलीस स्टेशनला आणल्यावर मूलीचा जबाब नोंदवला जातो. त्यामधे मूलीला सर्व माहिती विचारली जाते. त्यामधे ती सांगते”” मी स्वतहून फोन केला त्याला बोलावून घेतले आणि मी माझ्या संमतीने मुलासोबत शरिरसंबंध केले ह्यामधे त्याचा काही गुन्हा नाही” परंतु कायद्यामधे अल्पवयीन व्यक्तीची संमती ग्राह्य धरल्या जात नाही व मुलाच्या विरुद्ध IPC कलम ३७६, POCSO act 2012 अन्वये कलम ४.६ झालेल्या एफआयआर मधे अतिरिक्त कलम वाढ करण्यात येते. त्यामधे मुलाला ताबडतोब अटक करण्यात येवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. मूलीची सुद्धा बलात्कार संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यात येवून पुढचा तपास सुरु होतो. पोक्सो अॅक्ट मधे ७ वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा होवू शकते. साधारण चार्टशिट मा न्यायालयात दाखल झाल्यानंतरच आरोपीची बेल होवू शकते. गुन्हा सेशन कोर्ट आणि स्पेशल कोर्टासमोर चालतो. एक वर्षाच्या आतच केस ची ट्रायल सुरु होते. दोषसिद्धी करण्यासाठी कोर्टाला जास्त पुराव्यांची आवश्यकता नसते म्हणून अल्पवयीन मुलीसोबत पळून जाण्याचा मूर्खपणा आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो.
सध्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता आवर्जून ग्रुप वर हा मेसेज शेअर करावासा वाटला
निता कायटे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन