पाचोरा- जनता कर्फ्यु चे पालन करता येईल. म्हणून सदर धंदे त्वरीत बंद करण्यात यावे या विषियीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांना देण्यात आले.

0
493

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
७/५/२०२१
पाचोरा- जनता कर्फ्यु चे पालन करता येईल. म्हणून सदर धंदे त्वरीत बंद करण्यात यावे या विषियीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांना देण्यात आले.
एका बाजूला केसेस जलद गतीने वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिवाय लसीचा एक डोस घेतलेला नागरिकांना दुसरा डोस वेळेवर मिळेल की नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यांना होणारे लस वाटपही रुग्णसंख्येच्या प्रमाणात होत नसल्याचे आकडेवारी सांगते. शिवाय लसीकरण केंद्रांवर उडणारी झुंबड आणि तेथील नियमांचे जबाबदारीने पालन न करणारी जनता आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी वरदान असलेली लस राज्यांसाठी मात्र सर्व प्रकारे आव्हान ठरत आहे. आज जनता कर्फ्यु लावण्यात यावा जेणेकरून कोरिनाचा प्रभाव आटोक्यात आणता येईल या संधर्भात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व पक्षीय बेठकीचे आयोजन केले होते… या वेळी शहरातील व तालुक्यातील सट्टा, पत्ते बंद करण्यात यावे जेणे करून बाहेरून येणाऱ्या लोकांवर अंकुश बसेल व सर्वांना lockdown.. जनता कर्फ्यु चे पालन करता येईल. म्हणून सदर धंदे त्वरीत बंद करण्यात यावे या विषियीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने आमदार साहेब यांना देण्यात आले..या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भाऊसो अनिल वाघ (उपजिल्हाप्रमुख) माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पवार, सभापती मॅडम यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.