पाचोरा- ग्रामीण रुग्णालयाच्या १०२ रुग्णवाहीकेने घेतला पेट

0
851

आरोग्य दूत न्यूज

एन एस भुरे (संपादक)

दि,९/५/२०२१

पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या १०२ रुग्णवाहीकेने घेतला पेट

पाचोरा- येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहीकेला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटना स्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या वापरात नसलेल्या १०२ रुग्णवाहिकेस दि. ९ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सदर आगी बाबत घटना स्थळा जवळच असलेल्या आतिश चांगरेेे व नरसिंग कंडारे यांनी तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलास कळविल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे राजेश कंडारे (फायरमन), राजु भोसले (चालक), दिपक पाटील, फिरोज भाई यावेळी   पो. कॉ. मनोज माळी. या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. व पुढील होणारा अनर्थ टळला. कारण जवळच ग्रामीण रुग्णालय, स्टम्प वेंडर यांची कार्यालय, झेराॅक्सची दुकाने आहेत. तसेच आग लागलेल्या रुग्णवाहिके जवळच कार्यरत असलेली ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहीका उभी होती. चालकाच्या सतर्कतेने रुग्णवाहिका बाजुला घेतल्याने होणारा पुढील अनर्थ टळला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन घटनेबाबत माहिती जाणुन घेतली. आग लागण्याचे कारण समजु शकले नाही. सदरची रुग्णवाहीका उभी असलेल्या ठिकाणी कचरा पेटविल्याने रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचा प्रथमदर्शनींकडुन अंदाज वर्तविण्यात येत आहे.