जळगांव जिल्हा पोलीस दलाचे कोरोना लसीकरणाचे यश

0
478

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि, ११/५/२०२१
जळगांव जिल्हा पोलीस दलाचे कोरोना लसीकरणाचे यश
डॉ.प्रविण मुंढे पोलीस अधिक्षक , जळगांव मी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेे. मी व माझे सर्व सहकारी , अधिकारी , कर्मचारी यांनी कोवीड -१ ९ प्रतीबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.त्यादरम्यान आम्ही सर्व आमच्या पत्नी व मुले यांच्या दररोज संपर्कात आहोत. तसेच कर्तव्या दरम्यान जनतेच्या देखील सतत संपर्कात असतो दरम्यान माझे सहकारी , पो.हे.कॉ. हंसराज मोरे , म.पो.हे.कॉ.शारदा भावसार , पोलीस नाईक , विनोद पाटील , पो.कॉ.सुनिल पाटील , पो.कॉ.मनोहर पाटील अश्या सर्वांच्या पत्नी व मुले यांची अल्पशा लक्षणामुळे कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली दरम्यान आम्ही पत्नी व मुलबाळ यांच्या सतत संपर्कात असुन देखील माझे वर नमुद सहकारी अश्या सर्वांची कोरोना चाचणी निगेटीव्ह च आली. लसीकरण करुन घेतल्याने आम्हाला १०० % कोरोना पासुन संरक्षण मिळाले आहे . मी आपणा सर्वांसोबत हा अनुभव शेअर करीत असुन आपण सर्वांनी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी लसीकरण करुन घ्यावे.असे मा.पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे सर, जळगांव यांच्या वतीने आपणांस विनम्र आवाहन करीत आहे. किसनराव नजन पोलीस निरीक्षक, पाचोरा हंसराज मोरे पो.हे.कॉ. पाचोरा शारदा भावसार म.पो.हे.कॉ..पाचोरा विनोद पाटील पोलीस नाईक.पाचोरा सुनिल पाटील पो.कॉ. पाचोरा मनोहर पाटील पो.कॉ. पाचोरा