एन एस भुरे (संपादक)
दि, १२/५/२०२१
पाचोरा-नवजीवन कोविड सेंटरमध्ये भरलेली संपूर्ण रक्कम परत सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
पाचोरा-नवजीवन कोविड सेंटरच्या माणुसकीने भारावले तळईकर
एरंडोल तालुक्यातील तळई येथील आनंदा सुखदेव पाटील वय 55 व सौ कोकिळाबाई पाटील या दांपत्याला नुकतीच कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे त्यांना पाचोरा शहरातील मोंढाळा रोड वरील *नवजीवन कोविड* मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना योग्य ते बिल आकारून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र तळई गावाचे सरपंच भाईदास पाटील यांनी नवजीवन कोविड केअर सेंटरच्या संचालकांना भेटून सदर रुग्णांची आर्थिक परिस्थीती अतिशय नाजूक असल्याची माहिती दिल्या नंतर सर्व संचालकांनी या रुग्णाकडून आकारलेले वैद्यकीय बिल परत करण्याचा निर्णय घेतला व हे बिल परत करण्यासाठी डॉ विरेंद्र पाटील, डॉ जीवन पाटील,अभिलाष बोरकर,आनंद मेडिकल चे संचालक नंदू प्रजापत यांनी सरपंच भाईदास पाटील यांच्या समक्ष तळई तालुका एरंडोल येथे जात त्यांनी रुग्णास त्यांनी नवजीवन कोविडला भरलेली संपूर्ण रक्कम परत देऊन माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे त्यामुळे भारावलेल्या तळेईकर येथील रुग्णांनी सर्व संचालकांचे आभार व्यक्त केली असून नवजीवन कोवीड केअरच्या संचालकांनी एक चांगला आदर्श समाजापुढे घालून दिला आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.