आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि, १४/५/२०२१
भडगाव- कोरोना काळात असंख्य कोरोना रूग्णासह इतर आजार असलेले रूग्णांवर यशस्वी उपचार देऊन घरी रवाना करणारे आणि दिवस रात्र शासकीय सेवेतुन जनसेवा करणारे परीचारीका मदतनिस यांचा सन्मान कुठे तरी झाला पाहिजे या हेतु व उद्देश समोर ठेऊन अनिल वाघ यांच्या डोक्यात संकल्पना आल्यानंतर भडगाव ग्रामीण रूग्णालयात पुरण पोळीचे जेवण अक्षय तृतीयेच्या निमित्ताने देण्याचे निश्चित केले.आपल्या कुटंबा पासून दूर आपले कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामीण रुग्णालय भडगांव येथील कर्मचारी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कडून पुरण पोळीचे जेवण देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा छोटासा प्रयत्न केला.. या वेळी अनिल वाघ, भडगांव चे तहसीलदार ढवळे साहेब, डॉ. पंकज जाधव, प्रहारचे विजय भोसले, अमोल कांबळे, रामा पवार, सनी सोनवणे, अजय सोनवणे, रहीस, उमेश, रवी पाटील, महाजन दादा, यांच्या सह कर्मचारी बांधव उपस्थित होते.