गोंदेगाव येथे गजानन क्लिनिक चे शानदार उदघाटन

0
548

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि, १५/५/२०२१
गोंदेगाव ता. सोयगाव (वार्ताहर) :-(प्रज्वल चव्हाण)
गोंदेगाव येथे डॉ.रविप्रसाद चौधरी  यांचे गजानन क्लिनिक चा उद्घाटन सोहळा आज पार पडला.  यावेळी कन्नड सोयगाव मतदार संघाचे आमदार उदयसिंग राजपूत व मोनालीताई पिता राजेंद्र राठोड यांनी रिबीन कापून उदघाटन केले . व यावेळी उपस्थित सोयगाव येथील पीआय सुदाम शिरसाठ साहेब उपस्थित होते . यावेळी आमदार साहेबानी डॉ .रविप्रसाद याना शुभेच्या दिल्या. व त्यांना सांगितले की प्रत्येक रुग्णाला माणुसकीची वागणूक द्या, व गोरगरिबांना समजून घ्या . व कोविड काळात डॉक्टरच देव आहेत असे सांगितले.
यावेळी उपस्थित ग्रा.प.सरपंच वनमाला निकम, उपसरपंच दीपक अहिरे, सदस्य अतुल बोरसे, प्रशांत चौधरी,गौरव बिंदवाल, समाधान सूर्यवंशी,विजय नगरे सर,दीपक खोडके,व  डॉ.प्रवीण दादा चौधरी, प्रा.शांतीलाल चौधरी सर ,आबाराव चौधरी,पल्लवी चौधरी, व  समस्त गावकरी उपस्थित होते.