भडगाव- महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील व मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भडगांव कोविड सेंटर येथे आरोग्यवर्धक फळ व सकस आहार वाटप करण्यात आले.

0
246

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,१५/५/२०२१
भडगाव- महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील व मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटर व रक्तदान शिबिर येथे आरोग्यवर्धक फळ आहार वाटप
पोलिस स्टेशन भडगांव महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील व वडजी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भडगांव कोविड सेंटर येथे आरोग्यवर्धक फळ व सकस आहार वाटप करण्यात आले.वडजी टी.आर.पाटील विद्यालयात शिव प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर या सेवाभावी उपक्रमास योजना पाटील यांनी प्रेरणारूपी प्रोत्साहन म्हणून रु.पाच हजाराचे मानधन प्रदान केले.कोरोना पार्श्वभूमिवर कोविड रुग्णांना मानसिक आधार देणे खूप महत्वाचे असते.तसेच कोरोना परिस्थिती व कोविड लसिकरणामुळे रक्ताचा तूटवडा निर्माण होऊ शकतो त्यासाठी लसिकरणापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे.कोरोना प्रतिबंध मास्क वापरा,फिजिकल डिस्टेंट ठेवा, काळजी घ्या,सुरक्षित रहा व प्रशासनास सहकार्य करा असे डॉ.पंकज जाधव व नगरसेविका योजना पाटील यांनी नमूद केले.सदर प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ.पंकज जाधव,डॉ.गेडाम सर,डॉ.अहिरे सर,वैशाली पवार सह कोविड सेंटर वरील कर्मचारी वर्ग, राष्ट्रिय चर्मकार संघाचे अध्यक्ष रविंद्र अहिरे,वडजी शिव प्रतिष्ठान ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते,सामजिक कार्यकर्ते नितिन महाजन व आबा महाजन मित्र परिवार सदस्य,मोहसिन खान,शफीक खान, मा.प्र.मुख्याध्यापक बी.वाय.पाटील,लिपीक देवेंद्र पाटील,नगराज पाटील,लक्ष्मण भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.सदर सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.