आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे संपादक
दि,१७/५/२०२१
पाचोरा- पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे राष्टीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला.
सर्व शहर वासी व ग्रामीण जनतेला आवाहन करण्यात येते की
कोरोना सोबतच डेंगू आजारीची काळजी घेणे गरजेचे आहे असे आहावन जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील मॅडम व पाचोरा ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे यांनी केले आहे ..
राष्ट्रीय डेंगू दिवस १६ मे २०२१ पाचोरा ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे साजरा करण्यात आला असता नागरिकांनी खालील काळजी घेणे आवश्यक आहे
आपल्या घरातील पाण्याची भांडी राजन हौद दर सात दिवसातून एकदा रिकामे करणे . घासून पुसून स्वच्छ करून ठेवणे आपल्या घराचं परिसर स्वच्छ करून ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचं भांडी झाकुन ठेवावे जेणे करुन डास आळी तयार होणार नाही . ताप आल्यास रक्ताची तपासणी करून घ्यावी. मच्छर दानीचा वापर करावा
नागरिकांना कोरडा दिवस पाळावा
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जी एस काकडे आरोग्य सेवक पाचोरा तेसेच सर्व आरोग्य कर्मचारी ग्रामीण रुग्णालय पाचोरा हजर होते.