भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेतर्फे शंतनू शिंदे चा  विशेष सन्मान…

0
187

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,१७/५/२०२१
भडगाव- डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड चॅलेंज 2021अंतर्गत डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन,स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या प्रकल्पामध्ये सात फेब्रुवारीला भारतातील १००० विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करून विश्वविक्रम,आशियाई विक्रम,भारतीय विक्रम,असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड विक्रम स्थापित करण्याचा मान मिळविला यात आपल्या संस्थेच्या लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांचे चिरंजीव शंतनू कमलेश शिंदे याने प्रमुख सहभाग नोंदवला यामुळे त्याला World Books of Record, Guinness World Record, Assist World Record,India Books of Record,Asia Books of Record हे पाच जागतिक विक्रम नोंदवल्यामुळे त्याला या जागतिक विक्रमाची सहभाग बाबत सन्मानपत्र जागतिक विक्रमाची नोंद घेणाऱ्या संस्थांकडून नुकतीच प्राप्त झाली.सदर बाब आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी व संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.त्याअनुषंगाने कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी  पाटील किसान शिक्षण संस्थेमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती वातावरणात शंतनू व त्याचे वडील कमलेश शिंदे यांचा विशेष सत्कार,शुभेछ्या संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई प्रशांत पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील यांच्या हस्ते करून त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.त्याच बरोबर संस्थेतील कला महाविद्यालय कोळगाव येथील प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष माळी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि जळगाव तर्फे पी.एच.डी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.सदर प्रसंगी संस्थेतील प्राचार्य,मुख्याध्यापक आर.आर.वळखंडे,ए.बी.बोरसे,
वैशाली पाटील मैडम,विद्या पवार मैडम,सुनिल एच.पाटील,
आर.एस.पाटील,डी.डी.पाटील,
ए.पी.बागुल,डॉ.संतोष माळी,टी.एस.पाटील,अभिजित शिसोदे,एस.आर.पाटील,एस.व्ही. शिंदे,एस.डी.गुजेला सह सहकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.