पाचोरा- मा.मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात लोकाभिमुख उपक्रम

0
474

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे संपादक
दि,१७/५/२०२१
पाचोरा- मा.मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात लोकाभिमुख उपक्रम
पन्नास गावात सोडियम हायपोक्लोराइट ची फवारणी व कोरोणा रुग्णांना फळ वाटप

पाचोरा-
येथील भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगाव च्या वतीने मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे बोर्ड-बॅनर  नलावता कोरोनासारख्या परिस्थितीत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले, चिटणीस सोमनाथ पाटील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व अमोल पाटील आणि जिल्हा  यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत सोडियम हायपोक्लोराइट ची फवारणी करण्याचा संकल्प करून त्याची सुरुवात आज भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी या गावापासून करण्यात आली यामध्ये पाचोरा भडगाव तालुका मिळून जवळपास पन्नास गावांमध्ये ही फवारणी केली जाणार असून,त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावे निर्जंतुकीकरण करुन याचा नक्कीच लोकांच्या आरोग्यासाठी फायदा होईल असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच आमदार महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोणाच्या बिकट परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करता लोकाभिमुख उपक्रम राबवावे असे आवाहन केले होते. त्या निमित्ताने आम्ही पाचोरा व भडगाव तालुक्यातून जवळपास पन्नास गावे ही फवारणी करून निर्जतुकीकरण करण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात आज भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी या गावातून करीत आहोत. असे देखील त्यांनी बोलताना सांगितले तसेच यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना फळ वाटप करून आमदार महाजन यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने पाचोरा व भडगाव तालुक्यात साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ