मेडिकल विक्रेत्यांना म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन साठ्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार

0
333

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दिनांक १८ मे, २०२१

मेडिकल विक्रेत्यांना म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन साठ्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार

जळगाव, राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या रुग्णांच्या उपचारासाठी Amphotericin B इंजेक्शनाचा वापर करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना Amphotericin B इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबत आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कार्यालय, मुंबई यांचेकडील दिनांक १७ मे, २०२१ रोजीच्या पत्रान्वये सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथरोग अधिनियम, १८९७ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये, सर्व मेडीकल डिलर्स, किरकोळ मेडीकल विक्रेते यांचेसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढीलप्रमाणे आदेश पारीत केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांनी Amphotericin B या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांना द्यावी.

जळगाव जिल्ह्यातील खाजगी वितरकांकडे उपलब्ध Amphotericin B इंजेक्शन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांचे सल्ल्याने औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांनी ज्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. अशा रुग्णालयांना आवश्यतेनुसार वाटप करावे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आणि जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी

आपल्या अधिनस्त रुग्णालयात Amphotericin B या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यास म्युकरमायकोसिस उपचार करणाच्या खाजगी रुग्णालयांनाच Inj. Amphotericin B चा पुरवठा प्रथम येणान्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve) देवून उपलब्ध करुन द्यावे. जळगाव जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना संपूर्ण डोससाठी लागणारी औषधी एकाचवेळी रुग्णांना देण्यात येऊ नये. एक किंवा दोन दिवसांची मात्रा रुग्णालयास उपलब्ध करुन द्यावे. Amphotericim B या इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर औषधांच्या किंमतीएवढी रक्कम खाजगी रुग्णालयाकडून जिल्हा आरोग्य सोसायटीच्या कोविड १९ या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.