आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,२१/५/२०२१
एरंडोल – तालुक्यात वाढत्या रूग्ण संख्येने सर्वाना धडकी भरली आहे . कोरोनाची ही साखळी रोखण्यासाठी माननिय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लाँकडाँऊन करण्यात आले. शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना सकस व पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे.
म्हणून आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे विविध प्रकारचे सकस आहार देण्याचे उपक्रम गेल्या महिनाभरापासून हाती घेतला आहे..
ऑक्सीजन वर उपचार घेणाऱ्या रुग्णांना नॉनव्हेज (मटण)वाटप करण्यात आले.
त्यावेळी मेडिकल अधिकारी डॉ मुकेश चौधरी, सिस्टर सुनिता देवरे, वाॅडबॉय दिपक महाजन, गजानन वाघ, यांचा सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते,
रुग्णांना सकस आहार देऊन त्यांची प्रतिकारशक्ती व मनोबल वाढवण्यासाठी विक्की खोकरे अहोरात्र रात्र मेहनत घेत आहे
त्यांचा या मदतीने हजारो रुग्णांना सकस आहार तर मिळतच आहे. त्याच बरोबर अश्या वाईट प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांना फार मोठा आधार देखील मिळाला आहे.
Home Uncategorized एरंडोल- ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना नॉनव्हेज(मटण)वाटप.. विविध प्रकारचे सकस आहार देण्याचे उपक्रम गेल्या...