COVID-19 लस कुणी व केंव्हा घ्यावी… १८ वर्षा वरील सर्वांना कोविड लस उपलब्ध आहे. पण सोशल मिडीयावर लोकांना लस बद्दल खूप चुकीची माहिती सांगीतली जात आहे. सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (डॉ. स्वप्निल पाटील)

0
605

आरोग्य दूत न्यूज

एन एस भुरे (संपादक)

दि,२१/५/२०२१

COVID-19 लस कुणी व केंव्हा घ्यावी…
१८ वर्षा वरील सर्वांना कोविड लस उपलब्ध आहे. पण सोशल मिडीयावर लोकांना लस बद्दल खूप चुकीची माहिती सांगीतली जात आहे.
सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
(डॉ. स्वप्निल पाटील)
मग मी डॉक्टर या नात्याने आपणास संपुर्ण माहिती खाली देणार आहे. घाबरु नका व सर्वांनी आवर्जुन लस घ्या नियमांचे पालन करा व या महामारीतुन सुरक्षीत रहा.
कोविड लस कुणी घ्यावी ?
तुम्ही कोविड पॉझिटिव्ह असल्यास आपण बरे झाल्यानंतर साधारण
३ महिन्या नंतर लस घ्यावी.
जर कोविड आजारातुन अॅन्टीबॉडीज किंवा प्लाझमा थेरेपिने बरे झालातः
आपण बरे झाल्यानंतर साधारण ३ महिन्या नंतर लस घ्यावी.
लसच्या पहिल्या डोसनंतर संसर्ग झाल्यास: दुसरा डोस बरे झाल्यानंतर ३ महिन्यांपर्यंत पुढे ढकलला पाहिजे.
एखाद्या व्यक्तीला इतर कोणत्याही गंभीर आजारासाठी आय.सी.यु/हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असल्यास लस घेण्यापुर्वी ४ ते ८ आठवडे थांबावे.
रक्त दानः लस घेतल्या नंतर १४ दिवसांनी किंवा कोविड आजारानंतर आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्हच्या १४ दिवसांनी रक्तदान केले जाऊ शकते.
स्तनपान देणारी महिला यांनी पण लस घेण्यास काही हरकत नाही.
लस घेण्यापूर्वी: नाकातील किंवा घश्यातील स्वॅब टेस्ट करणे आवश्यक नाही.
कोविशिल्ड २ डोस मधील अंतर १२ ते १६ आठवडे.
कोवॅक्सीन: २ डोस मधील अंतर ४ ते ६ आठवडे.
रीच रहा, सुरक्षीत रहा, मास्क वापरा, गर्दीत जाणे टाळा, काळजी घ्या.
डॉ. ग्रिष्मा पाटील
MBBS, DCH, (पुणे)
वाय सी. एम. हॉस्पिटल, पुणे बालरोग व नवजात शिशुरोग तज्ञ
डॉ. स्वप्निल पाटील
एम.बी.बी.एस.एम.डी. (मेडिसिन) गोल्ड मेडलीस्ट कन्सल्टिंग फिजिशियन (सायन हॉस्पिटल, मुंबई) क्रिटीकल केअर स्पेशालिस्ट (जसलोक हॉस्पिटल, मुंबई)

सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

सेवा आणि समर्पण

मातीतल्या माणसांची मनोभावे सेवा… निरामय आरोग्यासाठी आयुष्यभर समर्पण…

पहिला मजला, एस. एस. पाटील कन्स्ट्रक्शन ऑफिस, गजानन पेट्रोल पंप समोर, महाराणा प्रताप चौक, पाचोरा

Tel.: 02596-244136,

Mob. : +917709105764