पाचोरा- शहरातील भुकेलांना दोन घास यासाठी कॉग्रेस चे पदाधिकारी रणरणत्या उन्हात अन्नदानाचे पाकीट घेऊन वाटप करत होते निमित्त ठरले स्व राजीव गांधी पुण्यतिथी.

0
648

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
पाचोरा- कॉग्रेस व महीला कॉग्रेस सह जळगाव जिल्हा सोशल मीडिया च्या माध्यमातून स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आली यात सुरवातीला स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस इरफान मनियार, जिल्हा महिला काँग्रेस च्या अॅड मनिषा पवार, तालुका अध्यक्ष कुसुम पाटील, शीला सुर्यवंशी सोशल मीडिया चे राहुल शिंदे, कल्पेश येवले,गजेंद्र पाटील, गणेश पाटील, शिवाजी पाटील, बबलु ढाकरे, सोनु पुजारी आदी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या संगणक युगामुळे विद्यार्थींसह परदेशातील कामे कोरोना काळात अॉनलाईन संगणकावर करण्यात आले त्यांचे योगदान देश कधीच विसरणार नाही. यानंतर पाचोरा कॉग्रेस सह महीला कॉग्रेस, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या आवारात काही गरजुंना अन्य दानाचे वाटप करण्यात आले त्यानंतर शहरातील स्टेशन रोड परिसर, भडगाव रोड परिसरातील गरजुंना त्याच्यां पर्यंत जावुन जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले यावेळी गरजुंनी पाकीट मिळाल्यावर लागलीच जेवण केल्याचे कॉग्रेस पदाधिकारींना दिसुन आले तेव्हा पदाधिकारींच्या डोळ्यात अश्रू आले. पाचोरा कॉग्रेस ने प्रत्येक कार्यक्रमात अन्नदानाचा सहभागाचा  संकल्प केला.