गोंदेगाव:- पहुरी गावात सरपंचाच्या मदतीने दारूबंदी ला प्रतिसाद

0
358

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
गोंदेगाव:- पहुरी गावात सरपंचाच्या मदतीने दारूबंदी ला प्रतिसाद
गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर):- गोंदेगाव जवळील पहुरी गावात गावरान दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला होता. सरपंच  हिराबाई धनजी मोरे व उपसरपंच व सर्व सदस्य यांनी पोलीस निरीक्षक श्री सुदाम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली  दारू विक्री  करणारे लोकांना घरोघर जाऊन सांगितले की माझ्या कार्यकाळात मी दारू विक्री करू देणार नाही असे सांगितले . तसेच गीते साहेब, दुबेले साहेब, तळेकर साहेब , गायकवाड साहेब यांनी गावात तीन दिवस ठिय्या मांडला व दारू विक्रेत्यांनी बंद करण्यास भाग पाडले. दारू विक्रेत्यांनी त्यांना सांगितले की यापुढे पहुरी गावात दारू विकली जाणार नाही असे आश्वासन दिले.सोयगाव तालुक्यातील एम आय एम चे अध्यक्ष  ‌आखिर दादा ‌व पुढारी पत्रकार चे भावराव मोरे  व पत्रकार प्रज्वल चव्हाण , बापू डवणे मा सरपंच निलेश भाऊ  मगर यांनी सर्वानी दारु बंद करण्यात सहकार्य केले . यांचे संगळ्यांचे  मी नाना मोरे आभार मानंतो व सर्व पोलीस व पत्रकार बंधूंच्या मदतीने  यश मिळवले.