पाचोरा- पंचायत समीती समोरील आमरण उपोषणाची माघार

0
225

 

पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील ओझर मौजे येथील रहिवासी ज्ञानेश्वर हिरामण सोनवणे, सिध्दार्थ शांताराम गायकवाड, राजाराम संभाजी सोनवणे,गोपाल दाजीबा सोनवणे,म्हाळसाबाई अशोक सोनवणे, यांचे रमाई व शबरी घरकुल योजने मध्ये घरकुल मंजूर असून “ड” यादीमध्ये नाव असुन ३वर्षा पासून हे लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नव्होता.
म्हणून दिनांक १९आॅक्टोबर रोजी पंचायत समिती पाचोरा समोर सरकारी सुचनांचे पालन करत चेहऱ्यावर मास्क, सोशल डिस्टंन्सिन चे पालन करत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले होते.व जो पर्यंत मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला होता.
आज दिनांक २०आॅक्टोबर रोजी उपोषणाचा दुसऱ्या दिवशी सभापती वसंत गायकवाड माजी सभापती सुभाष पाटील, बीडीओ, अतुल पाटील,यांनी लेखी आश्वासन दिले त्यावेळी तालुका सरचिटणीस शेलार भाऊ,प्रदिप पाटील, उपस्थित होते.
लेखी घेतल्या नंतर उपोषण माघार घेण्यात आले.
या उपोषणास संभाजी ब्रिगेड तसेच सर्व संघटनेने पाठींबा दिला, तसेच सर्व पत्रकार बांधवांचे ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आभार मानले.