पाचोरा- सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा मध्ये घडला चमत्कार – देवदुत डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांनी केली अभुतपुर्व यशस्वी कामगिरी जे होतं कुणासाठीही अशक्य – ते डाॅ. स्वप्निलदादांनी करवुन दाखवलं शक्य !!

0
835

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
पाचोरा- जे होतं कुणासाठीही अशक्य – ते डाॅ. स्वप्निलदादांनी करवुन दाखवलं शक्य !!
सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा मध्ये घडला चमत्कार – देवदुत डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांनी केली अभुतपुर्व यशस्वी कामगिरी
७० वर्षांची आजी – सीटी स्कोर २५ आणि आॕक्सीजन लेव्हल ७० असल्यावर देखील यमलोकातुन सुखरूप परतल्या जिजाबाई
आरोग्यदुत न्युज : काही चमत्कार क्वचित घडतांना आपण पाहत असतो.पण असाचं काही चमत्कार आपल्या पाचोरा शहरातील डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांच्या सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा मध्ये पाहण्याचा योग सर्वांना आला.
१००% कोवीड न्युमोनिया असलेले रूग्ण त्यात ७० आॕक्सिजन लेव्हल आणि २५ सीटी स्कोअर असतांना देखील डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांच्या यशस्वी उपचारानंतर फक्त २० दिवसातं कोरोनावर मात करून जिजाताई आज घरी परतल्या.
जिजाबाई गायकवाड यांचे वय ७० पार असल्याने त्यांची हि नाजुक परीस्थिती बघता त्यांचा योग्य उपचार करणे हे फार जिगारीचे धाडस सर्व सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा’ यांच्या टिमवर्कने यशस्वी करून आजीसोबत कोरोनावर मात करून दाखवली.
जळगाव सह खाजगी व गोदावरी हाॅस्पिटलमध्ये उपचार करून सुध्दा प्रकृती सुधारत नसल्याचे पाहुन शेवटी गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा येथे अॕडमिट करायचा निर्णय घेतला.
घेतलेला निर्णय हा फार मोठा होता पण डाॅक्टरांनी अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात घातल्यानंतर आपले शिक्षण व अनुभव दावावरती लावुन जिजाताईंचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि अयशस्वी व अशक्य कार्य शेवटी त्यांच्या टिमसोबत शक्य करून हा दैवी चमत्कार घडवुन आणला…!!
डाॅ.स्वप्निलदादा पाटील हे आमच्यासाठी देवदुत ठरले आणि त्यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हे अशक्याचे शक्य होऊन आमची जीजाताई यमलोकातुन सुखरूप घरी परतली अशी भावुक प्रतिक्रिया डिस्चार्ज देतांना गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी मांडली व डाॅ.स्वप्निलदादा पाटील व सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा चे मनापासुन अभिनंदन व आभार गायकवाड कुटुंबीयांनी मांडले आहे.