आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
पाचोरा-आज 31 मे हा दिवस जागतिक तंबाखु दिवस असुन जागतिक स्तरावर
म्हणुन साजरा केला जात असतो.त्या अनुषंगाने तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती व्हावी.World No,Tobaco Day (WNTD) म्हणुन साजरा केला जात असतो.त्या अनुषंगाने तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती व्हावी.तसेच लोकांना या घातक व्यसनापासुन परावृत्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात.यावर्षीची तंबाखु नकार दिनाचे शासकीय ब्रीदवाक्य Commit To Quit ही असुन या याद्वारे ज्यांना तंबाखूचे व्यसन सोडण्याची इच्छा आहे त्या सर्वांना असा संकल्प करण्याकरिता प्रोत्साहित करता येईल.
आज 31 मे जागतिक तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखू सेवनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या भयंकर परिणामांचे अवलोकन केले जावे व जास्तीत जास्त जनतेने तंबाखू सोडण्याची प्रतिज्ञा करावी व यासंदर्भात मार्गदर्शनासाठी शासकीय रुग्णालयांमधील समुपदेशक यांच्याकडे व व्यसन मुक्ती केंद्र येथे संपर्क करावा.तसेच खालील NATIONAL TABACOO QUITTINE 1800-11-2356 च्या देखील लाभ घेता येईल.
भारतातील सद्य परिस्थिती:-
भारतात प्रत्येक वर्षी जवळपास 08 ते 10 लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या आजारांमुळे होतो व भारतात आढळणाऱ्या एकूण कर्करोग रुग्णांपैकी 30% कर्करोग हे तंबाखू सेवनामुळे होतात. विविध प्रकारचे हृदयरोग,फुफ्फुसांच आजार, क्षयरोग,मोतीबिंदू पक्षघात सारखे विकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या तंबाखू सेवनाची निगडित आहेत. याशिवाय नपुंसकत्व येणे,गर्भवती स्त्रियांमध्ये कमी वजनाचे बाळ किंवा मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे.या गोष्टी ही आढळून आलेल्या आहेत.तसेच काही लोक व लहान मुलेही निष्क्रिय धूम्रपानाने बळी ठरतात.
तंबाखू मध्ये साधारणपणे चार हजार हुन अधिक रसायने असतात.ज्यातील बरेचसे घटक हे CARCINOGENIC म्हणजे कर्करोग कारक असतात. यांच्या सतत वापराने शरीराची न भरून येणारी झीज होते. जी व्यक्ती तंबाखूची पुडी तोंडात ठेवते त्या त्वचेचा तंबाखूशी सतत संपर्क होऊन तोंडात जखम होते किंवा तोंडात आतून व बाहेरून गाठ येते. तोंडात पांढरे-लाल चट्टे होतात तसेच तोंडाच्या आतील त्वचा जाड राट होऊन तोंड उघडणे मुश्कील होते.या सर्वांची परिणीती कॅन्सरमध्ये होते.शिवाय तोंडात तंबाखू,गुटखा,मावा असे पदार्थ चघळल्याने थुंकीचे प्रमाण वाढते व यामुळे अशी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकत असते. अशा थुंकन्याने विविध रोगांचा प्रसार होतो आणि सध्या कोरोना महामारी च्या परिस्थितीत हे ठिक-ठिकाणी थुंकणे रोग प्रसाराच्या दृष्टीने भयावह आहे.तसेच हे ही निष्कर्षाप्रत आले आहे की ज्या व्यसनी व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने कृत्रिम श्वासोश्वासाची गरज पडते व त्यांना बरे होण्यासाठी ही दीर्घकाळ लागतो. कारण फुफ्फुसांची कार्यक्षमता तंबाखूच्या धुराने आणि वापराने कमजोर झालेली असते.चला तर मग आज सर्वजण संकल्प करूयात की तंबाखू सारख्या घातक व्यसनांपासून दूर राहू व आपल्या प्रियजनांना देखील अशा व्यसनांपासून परावृत्त करू या.
डॉ. संपदा गोस्वामी (बोराडे)
दंत शल्यचिकित्सक
ग्रा.रु.पाचोरा
जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी.
जळगाव.