आंबेवडगाव- येथील  रहिवाशी दिलीप फुलचंद जैन.दिव्यांग शेतकऱ्याला अनोळखी व्यक्तीकडून रस्त्यावर अडवून  धमकी.

0
486

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
आंबेवडगाव- येथील  रहिवाशी दिलीप फुलचंद जैन.दिव्यांग शेतकऱ्याला अनोळखी व्यक्तीकडून रस्त्यावर अडवून  धमकी.
अंबे  वडगाव येथील रहिवाशी दिलीप फुलचंद जैन.  मंगळवर रोजी दुपारी सुमारे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास  पाचोरा येथून मित्राच्या दुचाकीवरून आंबे वडगाव येथे  घरी येत असतांना त्यांच्या जवळील भाजीपाल्याची थैली पटल्यामुळे  पाचोरा ते लोहारी दरम्यान बाजोरिया फॅक्टरी जवळ एका झाडाखाली उभे असतांना   पांढऱ्या रंगाच्या MH~12 , HL.8713 या क्रमांकांच्या व्हॅगनार  गाडीतून अनोळखी एक महिला व तीन पुरुष येऊन शेतीचा वाद असल्याचे सांगत  आणि त्यांचा कवडीचाही संबंध नसतांना मला दमदाटी केली. तसेच त्यातील एक तरुणाने मी फौजी आहे तुला पाहून घेईल,  मी आमच्या डिपार्टमेंट कडून गुन्हा दाखल करुन सगळ्यांना जेलमध्ये सडवेल आशा धमक्या देत होता दिलीप जैन. हे दिव्यांग असल्याने समयसूचकता राखत तेथे कोणत्याही प्रकारे वाद न घालता झाडाखाली थांबलो होते. याच दरम्यान  त्याच्यासोबत असलेल्या एका इसमाने फौजी तरुणास समजावून ते तिथून निघून गेले परंतु ते आंबे वडगावला बसस्थानक परिसरात येऊन थांबले  दिलीप त्यांच्या मागावून घरी येत असतांना त्यांनी बस स्थानक परिसरात अरेरावी करत दिलीप जैन यांना अडवून थांबवण्याचा प्रयत्न केला तसेच गाडीपर्यंत धावत आले. परंतु
प्रसंग सावधानता राखत जैन हे कसेबसे घरी पोहोचले मात्र या गैरप्रकारामुळे व अकस्मात मिळालेल्या धमकीने दिलीप जैन व  त्यांच्या परिवारातील सदस्यांना संबंधित अनोळखी  व्यक्तीकडून  जीविताला कधीही धोका  होऊ शकतो म्हणून संबंधित इसमाची चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाई करून  न्याय मिळावा म्हणून जैन यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अनोळखी इसमा विरुद्ध तक्रार दिली असल्याचे समजते