पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे आठवडी बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करण्यास आपल्या स्थरावरून आम्हास परवानगी द्यावी. समितीचे प्रशासक माजी आमदार दिलिप वाघ यांनी जिल्हाधिकार्‍याना पञ देण्यात आले.

0
314

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,३/६/२०२१
भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे आठवडी बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करण्यास आपल्या स्थरावरून आम्हास परवानगी द्यावी. समितीचे प्रशासक माजी आमदार दिलिप वाघ यांनी जिल्हाधिकार्‍याना पञ देण्यात आले.
पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे बाजार कोविड-१९ चे नियम
पाळून सुरु करण्यास आपल्या स्थरावरून परवानगी मिळावी समितीचे प्रशासक माजी आमदार दिलिप वाघ यांनी जिल्हाधिकार्‍याना पञ देण्यात आले.
माजी आमदार दिलिप वाघ यांनी दिलेल्या पञात नमुद करण्यात आले आहे की,महाराष्ट्र शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे आठवडी बाजार पुढील आदेश होईपावेतो बंद केलेले आहेत. मात्र सद्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व शेतीच्या मशागतीचा आहे. या काळात शेतकऱ्यांना पूर्व हंगामी मशागतीसाठी व नंतर देखील बैलाची नितांत आवश्यकता असते तसेच याच हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गायी, म्हशी शेळ्या यांची खरेदी विक्री करीत असतात. अनेक गरीब शेतकरी
वर्षभर पाळलेल्या शेळ्या मेंढ्या यांची या काळातच विक्री करून त्याच्या पैश्यातून वर्षभराचा शेईसाठी लागणारे खते बियाणे औषधी व मजुरी यासाठीची रक्कम जमवत असतो.
पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वरखेडी,भडगाव, नगरदेवळा या उपबाजार परिसरात
गुरांचे आठवडी बाजार नियमित भरत असतात. मात्र कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने अनियमित
कालावधीसाठी बंद केलेले आहेत. विद्यमान परिस्थितीत त्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित असे नुकसान होत आहे. काही बाहेर गावचे व्यापारी बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर सार्वजनिक व खाजगी जागेत बेकायदेशीर असे गुरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करत असून अडचणीचा काळ पाहून शेतकन्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट करत आहेत. तसेच बाजार समितीला देखील या बेकायदेशीर व्यवहारातून कोणतीही फी मिळत नसल्यामुळे बाजार समितीचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. सबब,मे.सो.यांना सविनय विनती की, पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे आठवडी बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करण्यास आपल्या स्थरावरून आम्हास परवानगी द्यावी. आठवडी बाजाराच्या दिवशी कोरोना प्रतिबंधक सर्व प्रकारच्या उपाययोजना करून आम्ही शेतकरी व
व्यापारी यांची त्यादृष्टीने पूर्णपणे काळजी घेण्याची हमी देतो. शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने तसेच आपल्या उपरोक्त आदेशातील कृषी संदर्भातील अटी मध्ये गुरांचे व्यवहार हा देखील कृषी क्षेत्राचा अविभाज्य घटक असल्याने आम्हाला सदरचे गुरांचे आठवडी बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करण्यास आपल्या स्थरावरून लवकरात लवकर आम्हास परवानगी द्यावी हि  विनती केली आहे.निवेदनाच्या प्रती ना.बाळासाहेब पाटील मंत्री सो.सहकार व पणन वस्रोद्योग ,ना. दादासाहेब भुसे मंत्री सो. कृषी, आमदार  किशोर पाटील विधानसभा सदस्य पाचोरा-भडगाव व जिल्हा उपनिबंधक जळगाव.यांना दिले आहे.
आज सकाळी बाजार समितीचे प्रशासक अॅड अभय पाटील यांनी वरखेड येथील गुरांच्या बाजारात ठिकाणी भेट दिली.ं तेथे सार्वजनिक व राष्ट्रीय महामार्गावर काही व्यापारी व शेतकरी बकऱ्या व गुरांचे व्यापार करतांना दिसले अशाप्रकारे मोकळ्या वातावरणात बाजार करणे धोकादायक असल्याची बाब त्यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली त्यानुसार सदर व्यापाऱ्याने अभय पाटील यांना बाजार आवार उघडे केल्यास आम्ही covid-19 चे नियम पाळून गर्दी न करता बाजार व्यवहार करू शकतो असे त्यांनी आश्वस्त केले बाजार आवाराच्या बाहेर होत असलेली खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मुळे बाजार समितीचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची बाब अॅड. अभय पाटील यांनी मुख्य प्रशासक दिलीप भाऊ वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली.