लोहारा येथे प्रतिष्ठिता कडील विद्यूतचोरी उघड धनदांडग्याची विद्यूतचोरी पकडल्याने एकच खळबळ

0
300

लोहारा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे खुशी मेडिकल & जनरल स्टोअर्स मध्ये गेल्या तिन वर्षांपासून विद्यूतचोरी सुरु होती .परंतु या बाबतीत कोणीही लक्ष देत नव्हते. म्हणून लोहारा येथील जागरूक नागरिक श्री.हेमंत गणेश गुरव यांना ते सहन झाले नाही .कारण ही राष्ट्रीय संपत्ती असून या विद्यूतचोरीने या परिसरात विद्यूतवितरण कंपणीला तुट सहन करावी लागत होती. परंतु ती तुट भरून काढण्यासाठी विद्यूतवितरण कंपनी इतर ग्राहकांच्या बिलावर तुटफंड वसूल करत होती. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी व चोरी करणारा सधन म्हणून त्यांनी पाचोरा कार्यालयात तक्रार केली. व त्यांच्या तक्रारी अर्जावरून सदरच्या मेडिकल व समोरील घरामध्ये होत असलेली खुप मोठ्या प्रमाणावर वीज चोरी तक्रारदार हेमंत गुरव यांच्या समोर प्रत्यक्ष पाहणी करून आज दिनांक २१/२०/२० बुधवार रोजी महावितरण विभागाचे , विलास डी. सिडाम-सहायक अभियंता , उपविभागीय कर्मचारी जोशी , लेखापाल अग्रवाल , लिपिक भालेराव , फोरमॅन , कर्मचारी निलेश शेळके , मनोज सोनार , रवी राऊत व कर्मचारी यांच्या समेवेत पाहणी करून रितसर पंचनामा करुन व तक्रारदार हेमंत गुरव यांचा लेखी जवाब घेवून पुढील कायदेशीर कार्यवाही केली असून लवकरच दंडात्मक कारवाई होणार आहे.
या कारवाईने लोहारा परिसरात विद्यूतचोरांचे धाबे दणाणले असून अशीच कारवाई सर्वदूर व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.