पाचोरा- कॉग्रेसने येथील भडगाव रोड परिसरातील गजानन पेट्रोलपंपावर प्रत्येक पेट्रोल व डिझेल भरणार्‍या ग्राहकांना पदाधिकारी यांनी पेढे देऊन अच्छे दिनची आठवण करून दिली.

0
283

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,७/६/२०२१
पाचोरा- कॉग्रेसने येथील भडगाव रोड परिसरातील गजानन पेट्रोलपंपावर प्रत्येक पेट्रोल व डिझेल भरणार्‍या ग्राहकांना पदाधिकारी यांनी पेढे देऊन अच्छे दिनची आठवण करून दिली.
भाजपा प्रणित मोदी सरकार ने अच्छे दिन चे स्वप्न दाखवले होते ते पुर्ण झाले नाही यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ने राज्यव्यापी आंदोलन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पुकारले होते. जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा कॉग्रेस ने येथील भडगाव रोड परिसरातील गजानन पेट्रोलपंपावर प्रत्येक पेट्रोल व डिझेल भरणार्‍या ग्राहकांना पदाधिकारी यांनी पेढे देऊन अच्छे दिन ची आठवण करून दिली कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण,  यांनी पेढे वाटले यावेळी जिल्हा सरचिटणीस नंदकुमार सोनार,माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, महिला तालुका अध्यक्ष कुसुम पाटील, अॅड मनिषा पवार, संगीता नेवे, शीला सुर्यवंशी, अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,सागर वाघ, यथ सुर्यवंशी, संदीप पाटील, मदन देवरे आदी उपस्थित होते. यावेळी भाजप आणि मोदीं विरोधात अच्छे दिन च्या घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल भरणारे ग्राहक पेढे खातानां संतप्त भावना व्यक्त करीत होते