जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी १२ अर्ज दाखल जळगाव,जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

0
191

आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,७/६/२०२१
जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी १२ अर्ज दाखल
जळगाव,जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी
जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण १२ तक्रार अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने
तहसिलदार जळगाव कार्यालयाकडे ४, तहसिलदार जामनेर-२, तहसिलदार पारोळा -१, तहसिलदार यावल १,
तहसिलदार चोपडा १, तहसिलदार पाचोरा यांचेकडे ३ याप्रमाणे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपवनसंरक्षक विवेक होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख राजेंद्र कपोते, सहायक निबंधक मंगेशकुमार शहा, पोलीस उप निरीक्षक मक शेख, वीज वितरण चे उप कार्यकारी अभियंता श्री. वाणी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. तर तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचेसह तक्रारदार नागरिक ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. आज प्राप्त अर्ज दाखल करुन घेण्यात आले व संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी २ दिवसात पाठविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिलेत. या अर्जावर संबंधित विभागांनी कार्यवाही करुन पुढील लोकशाही दिनात पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.