लोहारा येथे बस स्थानक परिसरात बसचे जोरदार स्वागत

0
185

लोहारा –  गेल्या अनेक दिवसांपासून सोयगाव बस आगारा कडे येथील प्रवासी संघटने कडुन सोयगाव ते जळगाव व्हाया लोहारा मार्गे दोन बसेस सुरू करण्या साठी प्रयत्न सुरू होते .मध्यनंतरी प्रवाशी संघटनेच्या आग्रहास्तव सोयगाव आगाराचे प्रमुख ठाकरे यांनी लोहारा येथे भेट देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली होती .त्यावेळी ठरल्या प्रमाणे सोयगाव आगाराच्या दोन फेऱ्या जळगाव साठी लोहारे मार्गाने सुरू करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज सकाळी ९ वाजता पहीली बस लोहारा बस स्थानक परिसरात आली .त्यावेळी बसचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवाशी संघटनेच्या वतीने सोयगाव आगाराचे वहातुक निरीक्षक के.बी. बागुल, वाहतुक नियंत्रक राहुल ठाकुर, वाहक बी एन ठाकुर,वाहक प्रभु चोपडे ,चालक वसंत सरोदे  यांचे रुमाल ,टोपी देऊन स्वागत करण्यात आले. व बसस्थानक परिसरात लालपरी च्या स्वागताच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र शेळके ,तंटा मुक्त समितीचे माजी अध्यक्ष ए ए पटेल, विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवराम भडके, पत्रकार संघाचे पदाधिकारी दिनेश चौधरी, कृष्णराव शेळके, दिपक पवार, नाना राजपुत, ईश्वर खरे, दिलीप चौधरी, तसेच शिवसेनेचे दिनकर गीते, संभाजी लिंगायत, शाम टेलर, कैलास धनगर, कडूबा भडके ,अंबादास चौधरी, सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष युवराज पाटील ,गर्जना संघटनेचे अशोक सोनार ,शेणफडू कोळी,सुरेश मोरे, अशोक क्षीरसागर, संजय सुर्वे इत्यादी मान्यवर हजर होते यावेळी हिरा टी सेंटर च्या वतीने चहा देण्यात आला .शेवटी ए ए पटेल यांनी सर्वांचे आभार मानले .