आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,१३/६/२०२१
भडगाव- महाराष्ट्र नवनिर्माण पत्रकार संघ
यांचे कडून कोरोना युध्दांचा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सन्मान पत्र
भडगांव:- दिनांक.14 रोजी महाराष्ट्र नवनर्माण पत्रकार संघ यांच्या वतीने कोरोना काळात आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडणाऱ्या कोरोना योध्दा यांचा..सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ- ग्रामीण रुग्णालय भडगांव.. वेळ- सायंकाळी 4 वाजता.. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.. आपण कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या आपत्तीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत निर्भीडपणे आपले कर्तव्य बजाविले. स्वतःची व आपल्या कुटूंबाची पर्वा न करता कोरोना महामारीचे हे युध्द जिंकण्यासाठी तन, मन, धनाने आपण आपले कार्य प्रमाणिक पणे निभावत आले आहात हे आपल्या मानवतेची व संवेदनशिलतेची प्रचिती देते. आपण बजावलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल आपणास महाराष्ट्र नवनिर्माण पत्रकार संघ यांचे कडून हे सन्मानपत्र देवून आपणास गौरविण्यात येत आहे. भाविष्यात अशिच सेवा आपल्या हातुन घडो, आपल्या उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…! ..
आपला नम्र
अनिल शामराव वाघ
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण पत्रकार संघ –