आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
आर.आर.पाटील
माजी सर्कल अध्यक्ष
वि.क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांनी भडगाव प्रकरणी वरिष्ठांना पाठवले पत्र त्यात राणे यांचा मृत्यु हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट नमुद
( खालील स्वरूपाचे निवेदन वजा पत्र पाठवण्यात आले आहे )
प्रती,
म.सचिव/अध्यक्ष
०१) वि.क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ०२) महाराष्ट्र राज्य तांत्रिक संघटना ०३) कामगार संघ ०४) वर्कस फेडरेशन
विषय: दिनांक ०७/०६/२१ रोजी भडगाव येथे झालेल्या घटनेबाबत
वरील विषयास अनुसरून आपल्या निर्दशनास आणु इच्छीतो की, दिनांक ०७/०६/२१ रोजी शिवसेनेने पाचोरा विभागातील सर्व कार्यालयांना व उपकेंद्रांना कूलुपे लाऊन आंदोलन केले ,आंदोलन झाल्यानंतर म्हणजे सुमारे १२:४५ वाजता काही समाजकंटक लोकांनी उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली व उपकार्यकारी अभियंताना यांना मारठोक केली इतपत हे सत्य आहे…परंतु कै राणे हे भांडणं सोडविण्यासाठी गेले व त्याच्यात त्यांचा म्रुत्य झाला हे साफ चूकीचे व खोटे आहे.
सत्यपरीस्थीती अशी आहे की उपकार्यकारी अभियंता यांना मारठोक झाली तेव्हा कै राणे हे काही सहकार्यांसोबत उपविभागात होते ..मारेकरी हे जेव्हा बाहेर आले तेंव्हा उपकार्यकारी अभियंता हे मारेकऱ्यांचा पाठलाग करत होते त्यांच्या मागे उपविभागातील काही कर्मचारी पण होते व त्यामध्ये राणे पण होते,मारेकरी फरार झाल्यानंतर राणेंची तब्येत बिघडली व शवविच्छेदन रिपोर्ट मध्ये राणेंना हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा म्रुत्य झालेला आहे असे निर्देशीत केलेले आहे…सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की अभियंता संघटनेने आपल्या चारही संघटनेची दिशाभुल करून आपला पाठिंबा मिळवून दि.०८/०६/२१ ची गेटमीटींग करून घेतली व तेथे भासविण्यात आले की,कै राणेंचा म्रुत्यु हा हाणामारीत झालेला आहे व तशी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली ,सर्व सत्य कहाणी भडगाव उपविभागातील कर्मचाऱ्यांना माहीत आहे
खोटी तक्रार दाखल केल्यामुळे ग्राहकांचा व शिवसेनेचा आपल्या कर्मचाऱ्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलण्याची शक्यता आहे व कर्मचारी हे दहशतीत व भांबावलेले आहेत तरी आपण चारही संघटनेच्या पाचोरा व जळगाव झोनच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक करून सत्य कहाणी ही समाज माध्यमांना देऊन आमचा चारही संघटनेच्या सभासदांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असे निर्देशीत करावे लागेल तरचं आपल्या सभासंदाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल
आपला
आर.आर.पाटील
माजी सर्कल अध्यक्ष
Home Uncategorized आर.आर.पाटील माजी सर्कल अध्यक्ष वि.क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांनी भडगाव प्रकरणी वरिष्ठांना...