जळागाव – महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई- गृहप्रवेश स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार,

0
373

आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,१५/६/२०२१
जळागाव – महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई- गृहप्रवेश स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार,
जळागाव- दि. १५/६/२०२१ – महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणेसाठी २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्यात महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले. या अभियानातंर्गत बांधण्यात आलेल्या ३ लाख २२ हजार ९२९ घरकुलांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच लाभाथ्र्यांना घराची चावी . तर या कार्यक्रमात जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर देण्यात आली. तर या वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी श्री. सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून श्री. वस वाघ यांना घराची चावी व वृक्ष देऊन त्यांना घराचा ताबा देण्यात आला.
या कार्यक्रमास मुंबई येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार आदि मान्यवर उपस्थित होते. तर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. तर मुक्ताईनगर खासदार रक्षाताई खडसे तसंच चाळीसगाव येथून खासदार उन्मेष पाटील तसेच प्रत्येक तालुक्याच्या ८. पंचायत समित्यांचे सभापती व लाभार्थी ऑनलाईन उपस्थित होते. आमदार, सौ. रत्ना वाघ यांनी शासन व प्रशासनाचे मानले आभार
अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत होतो. स्वतःच्या घराचे स्वप्न होते. शासनामुळे पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आणि आज ई-गृहप्रवेश झाल्याचा आनंद आहे. याबद्दल मोहाडी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे सौ. रत्ना वाघ यांनी शासन आणि प्रशासनाचे यावेळी आभार मानले. या लाभाथ्यांना देण्यात आली घरकुलाची ते आज
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांचे लाभार्थी श्री. देवचंद सोनू सुर्यवंशी, संतोष पंडित वाघ, शांताराम रामा तायडे, श्रीमती गंगूबाई देवराम सोनवणे, ज्ञानेश्वर दौलत सोनवणे या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्या हस्ते घराची चावी व वृक्ष देऊन घराचा ताबा दिला. त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येको पाच याप्रमाणे एकूण ७५ लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घराची चावी देऊन ताबा देण्यात आला. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ५४२५८ तर राज्य पुरस्कृत (रमाई, शबरी, पारधी) योजनेतंर्गत १७२८५ लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यापैकी ५१२३९ लाभार्थ्यांना तर राज्य पुरस्कृत योजनांच्या मंजूर लाभाथ्यापको १५८६० लाभाथ्र्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ३३६२७ तर राज्य पुरस्कृत योजनेतील १०३०९ घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ७९६ प्रलंबित घरकुलांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात डेमो हाऊस बांधकाम पूर्ण झाले असून घरकुल मार्ट सुरु करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक श्री. लोखंडे यांनी यावेळी दिली.
जळगाव दि. १५/६/२०२१
किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे
आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
किमान ८० ते १०० मिमि पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पिक तग धरु
शकते. मात्र जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतू पाऊस सर्वदूर
सारख्या प्रमाणात पडत नसून तुरळक स्वरुपात पडत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य चांगला पाऊस झालेला नाही. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिमि पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असेही श्री. ठाकूर यांनी कळविले आहे.
अर्ज एक, योजना अनेक उपक्रमातंर्गत
शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जळगाव दि,१५/६/२०२१ कृषि विभागाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना सदराखाली शेतकन्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष
लाभ मिळेपर्यंत एकल्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रणालीव्दारे कृषि यांत्रिकीकरण उपभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबांच्या (ट्रॅक्टर व औजारे/बियाणे/हरितगृह/शेडनेट/कांदाचाळ इ) इ) निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल
क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. वैयक्तिक
लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जावून त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी पूर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभाथ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.. महा-डीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरलो
असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात, ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला नसेल त्यांनी आपले अर्ज पोर्टलवर भरावेत, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले आहे.