आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,१७/६/२०२१
पाचोरा- नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर भिकाजी दराडे यांनी आमदार निधीतून पाचोरा तालुक्यातील दहा तर भडगाव तालुक्यातील सहा शाळांना सुमारे अठरा हजार रुपये किमतीचे प्रिंटर उपलब्ध करून दिले आहे.
येथील श्री गो से हायस्कूल मध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हे प्रिंटर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात श्री. गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, सु. गी.पाटील माध्यमिक विद्यालय भडगावचे मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे,जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वाणी यांनी मान्यवरांच्याहस्ते प्रिंटर स्वीकारले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर दराडे यांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापक अरुण पैठणकर, आकाश संजय वाघ,व्ही. आर. धातरट, ओ. व्ही.वन्से उपस्थित होते तर व्यासपीठावर मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी. एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर.पाटील, अजय अहिरे कार्यालय लिपिक अजय सिनकर आदि मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले.
Home Uncategorized पाचोरा- नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर भिकाजी दराडे यांनी आमदार निधीतून पाचोरा...