गोंदेगाव- वाकडी येथे कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे वाटप.

0
518

आरोग्य दूत न्यूज
गोंदेगाव ता. सोयगाव (वार्ताहर) :- प्रज्वल चव्हाण
गोंदेगाव- वाकडी येथे कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे वाटप.
सोयगाव तालुक्यातील आंजोळा व वाकडी येथे कृषी विभागाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2021/22 योजने अंतर्गत बियाणे वाटप करण्यात आले. कृषी विभागाकडून एकूण चाळीस हेक्टर शेत्रासाठी गुरुवार 17/06/21 रोजी वाकडी येथील सरपंच सौ.देवकाबाई ज्ञानेश्वर महाकाळ उपसरपंच सौ.छायाबाई रविंद्र शिंपी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित कृषी सहाय्यक बोरसे साहेब, कृषी सहाय्यक साळवे ,ग्रामसेवक राजेश डेपे, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.